
Potato Milk ट्राय केलं का? : 2022 साली असणार ट्रेंडमध्ये
बटाटा सर्व वयोगटातील लोकांना आवडतो. बटाट्याची भाजी, पराठे, वडे तर अगदी कसेही आणि कितीही खपतात. बटाट्यापासून मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट मिळते. त्यामुळे पौष्टिक पदार्थांच्या यादीत बटाट्याचा अगदी वरचा नंबर लागतो. पण बटाटा तुम्हाला निरोगी ठेवू शकतो, यावर तुम्हाला आता विश्वास ठेवावा लागेल. एका अहवालानुसार बटाट्यापासून मिळणारे दूध हे 2022 साली ट्रेडसेटर ठरणार आहे. वेटरोजने नुकताच फूज आणि ड्रिंक रिपोर्ट प्रकाशित केला. हा अहवाल पर्यावरणाचे लोकांवर असलेले महत्व अधोरेखित करतो. त्यामुळे भविष्यात वनस्पतींवर आधारित खाद्यपदार्थांची पुढील वर्षांत मागणी असणार आहे. या अहवालात बटाट्यापासून मिळणाऱया दुधाचे महत्व वाढणार असल्याचे म्हटले आहे.

काय सांगतो अहवाल- बदाम, सोया आणि ओट्सपासून तयार होणाऱ्या दूधापेक्षा बटाट्याचे दूध जास्त लोकप्रिय होईल, असे अहवालात म्हटले आहे. ज्याप्रमाणे कॉफी लोकप्रिय आहे, त्याचप्रमाणे या दूधाची मागणी वाढेल. अहवालानुसार, बटाट्याच्या दुधात चरबी आणि साखर कमी असते . त्यामुळे जगभरातील लोक त्याला पसंती देतील.
हे आहेत फायदे- बटाट्याचे दूध प्राणीजन्य नसून ते चरबीमुक्त आणि कोलेस्ट्रॉल मुक्त असल्याचे आढळून आले आहे. बटाट्याच्या दुधात कॅल्शियम असते. हे कॅल्शियम गाईच्या दुधाच्या बरोबरीने असल्याचे म्हटले जाते. तसेच बटाट्याच्या दुधात मिळणारी खनिजं आणि जीवनसत्व इतर कोणत्याही वेगन दुधापेक्षा जास्त असतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
इतर निष्कर्ष- कार्बन फूटफ्रिंट कमी करण्यावर लोकांचा भर राहिल. त्यामुळे हवामानाला सूट होणाऱ्या आहाराची निवड लोकांकडून केली जाईल, असे वेटरोजचा अहवालात नमूद केले आहे.यात प्रक्रिया केलेले मांस,चणे, टोफू, नट्स, कडधान्ये यांचा जास्त समावेश असेल. याशिवाय मांसाहाराचे प्रमाण कमी होईल. लोकांना बाहेर खाण्यापेक्षा घरी स्वयंपाक करून खाणे आवडेल तसेच अन्न वाया जाणार नाही याचीही ते काळजी घेतील. पुढच्या वर्षी उमामी आणि मसालेदार पदार्थांचा कल वाढेल.