esakal | भाताचाच पडला विसर
sakal

बोलून बातमी शोधा

rice

भाताचाच पडला विसर

sakal_logo
By
तेजस भागवत

जुनी गोष्ट. मी व जाऊ अशी आमची दोन विभक्त कुटुंबे असली, तरी सण एकत्र साजरे करायचो. सर्व मिळून सात जण होतो. कोणत्याही सणाला सर्व स्वयंपाक जाऊ वंदना व मी मिळून करणार. पुरणपोळीचा स्वयंपाक असेल, तर पुरणपोळ्या मात्र वंदना लाटणार, हा शिरस्ता! ती एकीकडे गरमागरम पोळ्या लाटायची आणि मी सर्वांना जेवायला वाढायचे.

एकदा दसऱ्याला नेहमीप्रमाणे पुरणपोळीचा स्वयंपाक होता. नवरात्रीचे उपवास असल्याने लवकरच स्वयंपाकाला लागलो. वंदना पूजा व इतर आवराआवरी करत होती. बाराच्या आसपास स्वयंपाक- वरण, भजी, पापड, मेथी, बटाटा, भाजी, आमटी सर्व झाले. फक्त जेवताना गरमागरम पोळ्या लाटायच्या एवढेच बाकी होते. दोघीही मस्तपैकी वर्तमानपत्र वाचत बसलो.

दीड वाजता नैवेद्य भरण्यासाठी सुरू केले. तेव्हा लक्षात आले. अर्रर्रर्रर्र... भात लावायला ‘मी’ विसरले होते. मग काय? कुकर नावाचा हेल्पिंग हँड मदतीला धावला. सर्व पदार्थ बाहेरील खोलीत नेईपर्यंत भात झाला. आम्ही दोघींनी हुश्श्श केले. ‘‘अरे, आज भात अगदी गरमागरम, मस्त वाटतोय,’’ सगळे म्हणत होते. आम्ही दोघी एकमेकींकडे पाहून हळूच हसत होतो. कारण गरम भाताचे टॉप सिक्रेट आम्हा दोघींनाच माहीत होते.

दुसऱ्या प्रसंगात बहिणीला जेवायला बोलावले होते. वंदना शाळेत गेलेली. म्हटले आपण करूयात पुरणपोळ्या! पण... कसचं काय? मला पोळ्या लाटायलाच जमेनात. नेहमी वंदना पोळ्या करत असल्याने मी कधीच पोळ्या लाटल्या नव्हत्या. शेवटी जेवायला आलेल्या बहिणीनेच पोळ्या लाटल्या व सर्वजण जेवलो. अर्थात, या प्रसंगानंतर मी पुरणपोळी लाटायला शिकले बरं का!

स्मिता वाळुंज, पुणे

loading image
go to top