थंडीत अनेक आजारांवर मात करेल 'ही' बर्फी ; जाणून घ्या रेसिपी : Ginger Barfi | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ginger Barfi

थंडीत अनेक आजारांवर मात करेल 'ही' बर्फी ; जाणून घ्या रेसिपी

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

थंडीच्या दिवसात सर्दी खोकल्यासाठी नेहमीच अदरकचा वापर केला जातो. यात औषधी गुणधर्म असतात. यातील अॅन्टीऑक्सीडेंट्स थंडीत होणाऱ्या अनेक आजारांपासून बचाव करतात. यात कोलेस्ट्रॉल नसते. यामुळे थंडीत चहात, नियमित आहारात याचा वापर केला जातो. याबरोबर घरीच याची तुम्ही बर्फी (Ginger Barfi) बनवू शकता. चला तर जाणून घेऊया याची रेसिपी..

साहित्य

अदरक- 200 ग्राम

साखर- 1.5 कप (300 ग्राम)

तुप- 2 छोटा चम्मच

वेलची- 10

दूध- 1 कप

कृती :

अदरकची बर्फी बनवण्यासाठी २०० ग्रॅम आदरक कट करून घ्या. यात एक कप दूध किंवा पाणी घालून मिक्सरमधून फिरवून घ्या. गॅसवर मध्यम आचेवर पॅन ठेवून एक मोठा चमचा तूप घाला. तुप गरम झाल्यावर यात आदरक पेस्ट घाला. तीन मिनिटे शिजवून घ्या. थोडे जाडसर मिश्रण आले की यात दिड कप साखर घाला.

गॅसवर हे मिश्रण एकसारखे हलवत रहा. साखर आणि आदरक पेस्ट एकजीव झाल्यानंतर वेलची पावडर घाला. परत दोन मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्या. आता एका ट्रेमध्ये बटर लावून हे मिश्रण पसरवून घ्या. आता याचे छोटे-छोटे तुकडे करून घ्या. झाली बर्फी तयार. याला तुम्ही एअर टाईट डब्यात पॅकबंद ठेवू शकता. एक ते दोन महिने ही बर्फी चांगली टिकते. थंडीच्या दिवसात याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल.

loading image
go to top