esakal | कांदा न वापरता बनवा लज्जदार ग्रेव्ही, 'ही' आहेत खास टीप्स 

बोलून बातमी शोधा

Gravy Tip In Marathi

ग्रेव्ही चविष्ट असेल तर अनेक जण पोटभर जेवण करतात. बहुतेकदा त्यात कांद्याचा वापर केला जातो. त्याऐवजी इतर साहित्य वापरुन ग्रेव्ही बनवा....

कांदा न वापरता बनवा लज्जदार ग्रेव्ही, 'ही' आहेत खास टीप्स 
sakal_logo
By
टीम ई सकाळ

औरंगाबाद - ग्रेव्ही म्हटलं आणि कांद्याचे नाव घेतले नाही, असे कधी होईल का ? एखादी भाजी असो किंवा चिकन, कांद्याच्या ग्रेव्हीने ती चविष्ट बनवण्याचा प्रयत्न केला जातो. बऱ्याचदा त्याचे भाव वाढल्यास ते वापरणे बंद केले जाते. तर चला ग्रेव्ही, बिना कांद्याचे चांगले आणि चविष्ट बनवता येऊ शकते. जाणून घेऊ या.. 

शेंगदाण्याची पेस्ट 
बिना कांद्याची ग्रेव्ही, तुम्ही शेंगदाण्याची पेस्ट टाकून लज्जदार बनवू शकता. कोणत्याही डिशमध्ये योग्य प्रमाणात इतर मसाल्यांबरोबर शेंगदाण्याची पेस्ट वापरल्यास तिची चव आणखी वाढते.  या व्यतिरिक्त बदाम, काजू पेस्टही वापरुन ग्रेव्ही बनवली जाऊ शकते. 

टोमॅटो पेस्ट 
कोणताही पदार्थ चविष्ट बनवण्यासाठी टोमॅटोचा नेहमी वापर केला जातो. मात्र टोमॅटोच्या मदतीनेही तुम्ही ग्रेव्ही तयार करु शकता. यासाठी एक ते दोन टोमॅटो उकडून पेस्ट बनवा आणि त्याचा वापर करा.

कोबीचाही वापर
- कोबी बारीक करुन घ्या आणि कुकरमध्ये चांगल्या प्रकारे शिजवून घ्या. कुकरमधून काढून त्याची पेस्ट तयार करा आणि इतर मसाल्यांबरोबर ग्रेव्ही म्हणून त्याचा वापर करा. यात थोडेसे बेसणही टाकून वापरु शकता. 

शलजम आणि आद्रकचा वापर 
साफ करुन शलजम आणि आद्रक उकडून घ्या आणि मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घ्या. हे बनवल्यानंतर तुम्ही ग्रेव्ही म्हणून कोणत्याही खाद्यपदार्थाबरोबर खाऊ शकता. तुम्ही यात दोन शिमला मिरची टाकूनही वापरु  शकता.

संपादन - गणेश पिटेकर