
गुरुपौर्णिमा हा गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि आध्यात्मिक उत्साहाने साजरा करण्याचा पवित्र सण आहे. या खास दिवशी आपल्या प्रियजनांसोबत मिळून गोड पदार्थ बनवून उत्सवाला आणखी रुचकर बनवूया! गुरुपौर्णिमेनिमित्त घरच्या घरी 'रव्याचा स्वादिष्ट शिरा' बनवू शकता. जो केवळ चविष्टच नाही तर बनवायलाही अत्यंत सोपा आहे. हा पारंपरिक मराठी पदार्थ सणासुदीला आणि विशेष प्रसंगी बनवला जातो, जो सर्वांना आवडतो. रव्याचा शिरा बनवण्यासाठी लागणारी सामग्री सहज उपलब्ध असते आणि काही मिनिटांतच हा गोड पदार्थ तयार होतो. केशर, वेलची आणि सुक्यामेव्याच्या सजावटीने याची चव आणखी खुलते. गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर हा शिरा बनवून गुरुंच्या आशीर्वादासोबत कुटुंबाला गोड आनंद द्या. चला तर मग जाणून घेऊया गुरुपौर्णिमेला शिरा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.