हृदयासह Skin Glowing होण्यासाठी होतो Olive Oil तेलाचा 'असा' फायदा

हृदयासह Skin Glowing होण्यासाठी होतो Olive Oil तेलाचा 'असा' फायदा

ऑलिव ऑयल तेलाचे अनेक फायदे आहेत. या तेलाचा वापर जेवण बनवण्यापासून ते स्किन ग्लोइंग होण्यासाठी केला जातो. ऑलिव ऑयलमध्ये व्हिटामिन-ई, व्हिटामिन के, आयरन, ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि अॅटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात असतात. ऑलिव ऑयल चा वापर जर नियमित केला गेला तर कॅन्सर सारख्या आजारावर मात करण्यास मदत होते. इतकेच नाही तर हृदयाला आरोग्यवर्धक ठेवते तर डायबिटीज कंट्रोल करण्यास ही मदत होते.

ऑलिव ऑयल खाण्याचे फायदेः

डायबिटीजः

डायबिटीज असणाऱ्या लोकांनी ऑलिव ऑयलपासून बनवलेले पदार्थ खाल्ल्यांनी डायबिटीज आणि शुगर लेवल नियंत्रि‍त ठेवण्यास मदत होते.

इम्युनिटीः

शरीरातील रोगप्रतीकार शक्ती वाढवण्यास मदत होते. इम्युनिटी मजबूत करण्यासाठी ऑलिव ऑयलपासून तयार झालेले अन्न तुम्ही खाऊ शकता.

वजन कमी करण्यास मदत होते

ऑलिव ऑयलमध्ये फॅट चे प्रमाण खूप कमी असते. ज्यामुळे वजन नियंत्रण राहण्यास मदत होते.

कॅन्सर :

ऑलिव ऑयल तेलाच्या वापराने कॅन्सर सारख्या आजारावर मात करण्यास मदत होते. यात अँटिऑक्सीडेंट सोबत व्हिटामिन A,D,E आणि B कॅराटीन ची मात्रा अधिक असते. ज्याचा फायदा तुम्हाला होवू शकतो.

सुरकुत्या:

ऑलिव्ह ऑइलमध्ये अँटीऑक्सीडेंट आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतात. जे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात. व्हिटॅमिन ई त्वचेसाठी चांगले मानले जाते. ऑलिव्ह ऑईल खाण्यासोबत त्वचेला मसाज करण्यासाठी वापरू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com