Healthy Food Receipe | गोड खावसं वाटतं आहे? ट्राय करा हा गव्हाचा केक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Healthy Food Receipe

Healthy Food Receipe: गोड खावसं वाटतं आहे? ट्राय करा हा गव्हाचा केक

केक खायला सगळ्यांनाच आवडतो, पण सध्याच्या काळात फिटनेस फ्रीक लोकांना केक खाता येत नाही. मुळात मैदा असल्यामुळे त्यात खूप फॅट्स असतात त्यामुळे मन मारावे लागते.

पण हा गव्हाचा खजूर केक अत्यंत आरोग्यदायी आहे. आपले सर्वांगीण आरोग्य राखण्यात फिटनेसची मोठी भूमिका आहे. निरोगी राहण्याबरोबर योग्य नियमित व्यायाम आणि योग्य पोषक घटक खाणे खूप गरजेचे आहे.

फिटनेस रूटीनला फॉलो राहणे खूप आव्हानात्मक असू शकते, विशेषत: जेव्हा तुम्हाला गोड खावस वाटतं; मिष्टान्नांमध्ये साखर, लोणी, चीज, मैदा आणि इतर अस्वास्थ्यकर घटक जास्त प्रमाणात असतात, ज्यामुळे त्या सर्व अतिरिक्त कॅलरीज कमी करणे कठीण होते.

मिठाईचा आनंद घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे डेट केक; ही रेसिपी मैद्याच्या ऐवजी गव्हाचे पीठ वापरून बनविली जाते. तुम्ही यात साखरेऐवजी गूळ देखील वापरू शकता.

साहित्य:

1 वाटी गव्हाचे पीठ

2 टेबलस्पून तेल

3-4 टेबलस्पून पिठीसाखर

1/2 टीस्पून व्हिनेगर

चिमूटभर सोडा

1 टीस्पून बेकिंग पावडर

2 थेंब इसेन्स

1 टेबलस्पून कोको पावडर

2 टेबलस्पून चोको चिप्स

1 वाटी दूध

कृती:

स्टेप 1

सर्व साहित्य काढून घ्यावे. एका पसरट भांड्यात तेल घ्या.

स्टेप 2

पिठीसाखर घालून थोडे दूध घालावे. सर्व एकत्र करावे. आता त्यात गव्हाचे पीठ घालून घ्या आणि त्यात इसेन्स, बेकिंग पावडर घालून घ्या.

स्टेप 3

दूध थोडे थोडे घालून केक बॅटर तयार कराव आणि शेवटी सोडा आणि व्हिनेगर घालून हलकेच हलवून घ्यावे.

स्टेप 4

मायक्रोव्हेव मध्ये 180° C pre heat करायला ठेवा. केकच्या भांड्याला आजूबाजूने तेल लावून त्यावर शक्य असेल तर फॉइल पेपर लावा नाहीतर गव्हाचे पीठ पसरवून घ्या.

स्टेप 5

बॅटर त्या भांड्यात टाका आणि चोकोचिप्स असल्यास थोडे मिश्रणात घाला. 20-25मिनिट मेक्रोवेव मध्ये केक तयार करा.

टॅग्स :recipe