हेल्दी रेसिपी : उपवासाचा हेल्दी मेन्यू! 

sweet-potato-khir
sweet-potato-khir

उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे. उपवास म्हणजे ईश्वराजवळ पोचण्याचा मार्ग, हा सर्वसाधारणपणे रूढ असणारा अर्थ. आणि या ईश्वरप्राप्तीच्या मार्गात येतात ते अनेक तळकट, पचनास जड, अपौष्टिक पदार्थ! खरेतर पूर्वीच्या काळी आपल्याकडे उपवासाचे साधे आणि मर्यादित असे पदार्थ केले जायचे. मात्र, आजकाल उपवासचे पदार्थ ‘पार्टी मेन्यू’प्रमाणे थाळीमध्ये सजलेले असतात. असो, उपवासाचे सर्वच पदार्थ काही हानिकारक नाहीत. खरेतर उपवासाखेरीज त्या-त्या ऋतूमध्ये अशा पदार्थांचे सेवन करणे सर्वांसाठीच लाभदायक ठरू शकते. 

रताळे 
रताळे, उपवासासाठी चालणारा एक घटक. वजन वाढविणारा म्हणून एरवी आपण याला आहारातून वर्ज्य करतो. मात्र खरे पाहता, यात असलेल्या उत्तमप्रकारच्या कर्बोदकांमुळे ‘प्री/पोस्ट वर्कआउट मिल’ म्हणजेच व्यायामापूर्वी किंवा नंतर तसेच, ‘बॉडी बिल्डिंग’ करणाऱ्यांसाठी रताळे उत्तम आहारघटक आहे. रताळ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहेत, जे पोटाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. यामधील अॅन्टिऑक्सिडंटमुळे ‘फ्री रॅडिकल्स’पासून शरीराचे संरक्षण होते. रताळ्यामधील ‘बी कॅरेटीन’च्या सेवनानंतर त्याचे व्हिटामिन ‘ए’मध्ये रूपांतरित होते, जे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक असते. मानसिक आरोग्य, स्मरणशक्तीसाठाही रताळे हा उपयुक्त घटक आहे. शेवटी आहार रोजचा असो किंवा उपवासाचा; खाणे हे केवळ ‘उदरभरण’ असू नये. शिवाय उपवास म्हणजे हलका आहार घेणे, एखादा दिवस शरीराला विश्रांती देणे, शरीराशी व आत्म्याशी संवाद साधणे, हेही होय व हा विचार एरवीही करायला हवा. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तेव्हा या नवरात्रीच्या उपवासांच्या निमित्ताने आहार, शरीर आणि आत्मा (मन) या तिघांशी सुसंवाद साधत उत्तम आरोग्य घडवूया. 

रताळ्याची खीर/ स्वीट पोटॅटो शॉटस् 
साहित्य- उकडून किसलेली रताळी, दूध, तूप साखर/गूळ, वेलची-जायफळ पूड, ड्रायफ्रुट (आवडीनुसार), सजावटीसाठी - गुलाबाच्या पाकळ्या 

कृती- 
१. रताळ्याचा किस तुपावर परतून दुधात शिजवणे. 
२. साखर घालून खीर चांगली शिजवून घेणे. 
३. आच बंद करून वरून तुपावर परतलेले ड्रायफ्रुट व उर्वरित साहित्य घालणे. 
४. खिरीप्रमाणे किंवा शॉट ग्लासेसमध्ये खीर घालून सर्व्ह करावी. (जेणेकरून एक पौष्टिक पदार्थ योग्य प्रमाणात खाल्ला जाईल.) 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

टीप- गूळ व दूध एकत्र न शिजवता खातेवेळी वरून दूध घ्यावे. दूध व गूळ एकत्र शिजवल्यास दूध फाटण्याची शक्यता असते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com