सध्याच्या ‘मॉडर्न डाएट’ मध्ये ‘सुपर न्युट्रीशिअस’ म्हणून काही घटकांचा आहारात समावेश करण्याचा आग्रह केला जातो. तसे हे घटक आपल्या आहारात पूर्वीपासूनच आहेत. ते म्हणजे ‘सीडस’. अर्थात, विविध प्रकारांच्या बिया. जवस, सुर्यफूल, तीळ, भोपळा, काकडी, वगैरेंच्या बियांचे नियमित सेवन अत्यंत फायदेशीर असते. शिवाय संध्याकाळी भूक लागल्यावर बियांपासून बनविलेली चिक्की, लाडू किंवा भाजलेल्या बिया खाता येतात.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
महाराष्ट्र खाद्यसंस्कृतीच्या माझ्या प्रवासात जवळपास सर्वच ठिकाणी या बियांचा वापर फार पूर्वीपासूनच विविध प्रकारे होत असल्याचे आढळले. काही बियांपासून तेल काढत, तर काही नुसत्याच खात किंवा त्यांपासून चटणी, भाजी, लाडू बनवित असत. पुढील काही लेखांमध्ये आपण या बियांपासून बनविल्या जाणाऱ्या काही पारंपारिक व पौष्टिक पदार्थांची माहिती घेणार आहोत. आज पाहूयात वाळकाच्या, म्हणजेच काकडीच्या बियांची माहिती व रेसिपी.
काकडीच्या बियांमध्ये कॅल्शिअम, सोडियम, मॅग्नेशिअम, झिंक, लोह, तसेच शरीराला उपयुक्त असणारी इतरही काही महत्त्वाची खनिजद्रव्ये असतात. उन्हाळ्यातील उष्णतेचे आजार, तसेच अशक्तपणावर काकडीच्या बियांचे सरबत लाभदायक असते. या बिया सर्व ऋतुंमध्ये खाता येऊ शकतात.
काकडीच्या बियांचे लाडू
साहित्य -
बिया, गूळ किंवा साखर पाक, वेलची पूड, जायफळ (ऐच्छिक)
कृती -
१. बिया भाजून वाटून घेणे.
२. साखरेच्या किंवा गुळाच्या पाकात उर्वरित साहित्य व बियांची पूड घालून मिश्रण बनवून घेणे.
३. थंड झाल्यावर लाडू वळणे.
टीप : पारंपरिक रेसिपीमध्ये ओल्या बिया चुलीतील राखेत चोळून त्यांपासून लाडू बनवितात. ओल्या बिया मिळाल्यास पारंपरिक पद्धतीनेही लाडू बनविता येतील.
काकडीच्या बियांची चटणी
साहित्य -
वाळकाच्या सुकलेल्या बिया (काकडीच्या बिया), कांदा, चिंचेचे पाणी, चटणी, लसूण, जिरे व मीठ.
कृती -
१. बिया भाजून कुटून घेणे.
२. कुटलेल्या बिया, लसूण व जिरे एकत्रित वाटणे.
३. कांदा, चिंचेचे पाणी, मीठ घालून एकत्रित करणे.
टीप : कोरडी चटणी करायची असल्यास कांदा व चिंचेचे पाणी घालू नये.
Edited By - Prashant Patil