हेल्दी रेसिपी : शेंगदाण्याचं झिरकं

शिल्पा परांडेकर
Tuesday, 7 July 2020

शेंगदाणे हा आपल्या रोजच्या स्वयंपाकातील एक आवश्यक घटक. भाजी, आमटी, चटणी, पंचामृत, लाडू, चिक्की असे काही खास शेंगदाण्याचे पदार्थ, तर भाज्या, उसळी, पोहे अशा अनेक मुख्य पदार्थांमध्ये थोड्या शेंगदाण्यांचा वापरही त्या पदार्थांची लज्जत वाढवितो. पूर्वी बाहेरून आलेल्या व्यक्तीचे गूळ, शेंगदाणे व पाणी देऊन स्वागत केले जायचे. प्रवासाचा क्षीण कमी होऊन त्यास ऊर्जा मिळावी हा यामागचा मुख्य उद्देश.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन, तेल आणि फायबर भरपूर प्रमाणात आहे. तसेच अँटिऑक्सिडंट, कॉपर, मॅंगेनीज, फॉस्फरस, मॅग्नेशिअम अशी महत्त्वाची खनिजे, ‘ई’ जीवनसत्त्व, ओमेगा-३ व ६ यांसारखी महत्त्वाची घटकद्रव्ये शेंगदाण्यातून मिळतात. खारे, तळलेले किंवा मसालेदार शेंगदाणे खाण्यापेक्षा वाफवलेले शेंगदाणे सलाडमध्ये घालून किंवा ‘चाट’प्रमाणे बनवून खाता येतील, तसेच शेंगदाणे रात्रभर भिजवून दुसऱ्या दिवशी सकाळी खाण्याचेही अनेक फायदे असल्याचे तज्ज्ञ सांगतात. शेंगदाण्याच्या नियमित सेवनामुळे हृदयविकार, बद्धकोष्ठता अशा विकारांवर आराम मिळतो. तसेच नियमित सेवनामुळे रक्ताची कमतरता दूर होते, हाडे मजबूत होतात व त्वचेचा पोतही सुधारतो.

महिलांच्या मासिक पाळी दरम्यानची पोटदुखी व ‘मूडस्विंगज्’वर गूळ व शेंगदाण्याच्या सेवनाने आराम मिळतो. आपल्याकडे शेंगदाण्याच्या तिखट, गोड, चटपटीत अशा अनेक पौष्टिक पाककृती आहेत. खरेतर आजची रेसिपी ही अडीअडचणीच्या वेळी, झटपट होणारा पदार्थ म्हणूनच अनेकदा केली जाते. मात्र, वर नमूद केलेले फायदे लक्षात घेता शेंगदाण्याच्या अशा पदार्थांचे नियमित सेवन करण्यास काहीच हरकत नाही. तेव्हा पाहूयात आजची खास शेंगदाण्याची, झटपट होणारी पौष्टिक रेसिपी – शेंगदाण्याचं झिरकं

साहित्य -
भाजलेले किंवा कच्चे शेंगदाणे, कांदा, तेल, जिरे, मोहरी, मीठ, हिरवी मिरची, लसूण, जिरे.

कृती -

  • शेंगदाणे, मिरची, लसूण व जिरे एकत्रित वाटून घेणे.
  • तेलात जिरे व मोहरीची फोडणी करून कांदा व वाटण घालून परतणे. 
  • पाणी घालून उकळी आणणे व शिजवणे.
  • आवडीप्रमाणे दाट किंवा पातळ ठेवणे.
  • भाकरीसोबत झिरकं खाण्यास तयार.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Healthy Recipe on Shengdanyach jhirak