Sprouts Thalipeeth: मोड आलेली कडधान्यं आणि गव्हाचं पीठ, कमी साहित्यात बनवा पौष्टिक थालीपीठ; मुलांच्या डब्यासाठीही उत्तम!

मोड आलेली कडधान्यं आणि गव्हाच्या पिठापासून बनवा पौष्टिक थालीपीठ. नाश्त्यासाठी आणि मुलांच्या डब्यासाठी उत्तम पर्याय!
Sprouts Thalipeeth

Sprouts Thalipeeth

sakal

Updated on: 

मोड आलेली कडधान्यं आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात. त्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे आहारात मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करणं चांगलं ठरतं. तुम्ही नेहमीच्या थालीपिठाला हेल्दी ट्विस्ट देण्यासाठी मोड आलेल्या कडधान्यांचा वापर करू शकता.

थालीपीठ हा महाराष्ट्रातील लोकप्रिय पारंपरिक पदार्थ आहे. साधारणपणे थालीपीठ भाजणीच्या पिठापासून बनवलं जातं. मात्र, या रेसिपीमध्ये गव्हाच्या पिठासोबत मोड आलेली कडधान्यं आणि काही मसाल्यांचा वापर केला आहे. त्यामुळे हे थालीपीठ चविष्ट, पोटभर आणि पौष्टिक बनतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com