हार्ट पेशंट्सने सकाळी काय खावे ? नाचणी डोसा ते ओट्स उपमा; तज्ज्ञांनी सुचवलेला आठवडाभराचा 'डाएट प्लॅन'

निरोगी हृदयासाठी फक्त औषधे किंवा व्यायाम पुरेसा नाही, तर रोज सकाळी आपण काय खातो याचाही थेट परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होतो.
Healthy Breakfast for Heart Patients

Healthy Breakfast for Heart Patients

Sakal

Updated on

आजच्या धावपळीच्या जीवनात हृदयाची काळजी घेणे पूर्वीपेक्षा जास्त गरजेचे झाले आहे. यासाठी फक्त औषधे घेणे किंवा व्यायाम करणे पुरेसे नाही, तर रोज सकाळी आपण काय खातो याचाही थेट परिणाम आपल्या हृदयाच्या आरोग्यावर (Heart Health) होत असतो. रात्रभराच्या मोठ्या गॅपनंतर सकाळचा नाश्ता शरीराला ऊर्जा देण्यासोबतच मेटाबॉलिझम सक्रिय करण्याचे आणि दिवसभर आरोग्य संतुलित ठेवण्याचे काम करतो.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर नाश्त्यामध्ये जास्त तेल, तूप, लोणी, तळलेले पदार्थ किंवा जास्त साखरेच्या पदार्थांचा समावेश केला, तर काही दिवसांनी कोलेस्टेरॉल, रक्तदाब आणि वजन वाढण्याचा धोका वाढू शकतो. म्हणूनच हृदयविकाराच्या पेशंटसाठी असा नाष्टा निवडणे आवश्यक मानले जाते, जो चवदार असण्यासोबतच हृदयासाठीही फायदेशीर ठरेल. चला तर मग जाणून घेऊया हृदयविकाराच्या रुग्णांनी आठवडाभर सकाळच्या नाष्टयात काय खावे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com