esakal | डायटमध्ये समावेश करा 'या' फळांचा: प्रोटीनची कमतरता निघेल भरून :High Protein Diet
sakal

बोलून बातमी शोधा

डायटमध्ये समावेश करा 'या' फळांचा: प्रोटीनची कमतरता निघेल भरून

डायटमध्ये समावेश करा 'या' फळांचा: प्रोटीनची कमतरता निघेल भरून

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

शरीराला हेल्दी ठेवण्यासाठी प्रोटीन महत्वाची भुमिका पार पाडत असते. शरीरात योग्य प्रमाणात प्रोटीन नसेल तर अनेक आजार उद्धभवतात. म्हणूनच आपल्या डायटमध्ये नियमित प्रोटीनयुक्त आहार असायला हवा. प्रोटीन शरीरातील मसल्स तयार करण्यासाठी गरजेचे असतात. यात आॅक्सिजन, नायट्रोजन आणि हायड्रोजन तयार करणारे तत्व असतात. म्हणून भारतीय आहारात मिठ, दूध, मासे, फळे, हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असतो.

शरीरातील हाडे तंदुरस्त करण्य़ासोबत रक्तपुरवठा (ब्लड फंक्शनिंग) करण्यास प्रोटीनची मदत होते. याचबरोबर स्किन आणि केसांना प्रोटीन लाभदायक असते. शरीरात जर प्रोटीनची कमतरता असेल तर अनेक आजार उद्धभवतात. यासाठी नियमित प्रोटीन गरजेचे आहे. आज तुम्हाला अशा फूड्स विषयी सांगणार आहोत ज्यात हायप्रोटीनचे प्रमाण जादा असेल.

डेअरी प्रोडक्ट:

दूध आणि दूधापासून तयार झालेल्या पदार्थात भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात. दूध, पनीर, मावा, चीज,लोणीमध्ये फक्त प्रोटीनच नाही तर व्हिटामीन, कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असतात.

ड्राई फ्रूट्स :

ड्राई फ्रूट्समध्ये प्रोटीन, व्हिटामीन, पोटॅशिअम आणि सोडियम असते. आरोग्य चांगले राहण्यासाठी नियमीत थोडे तरी ड्राई फ्रूट्स खाल्ले पाहिजेत. ड्राई फ्रूट्स प्रोटीनची कमतरता भरून काढतात.

किवी :

बाजारात फळांच्या मार्केटमध्ये छोट्या आकाराची हिरवी आणि सोनेरी रंगाची कीवी हे फळ दिसते. या फळाचा वापर फक्त रुग्णांनी करावा असे ग्रामीण भागात बोलले जाते. मात्र प्रत्येकाने हे खळ खाल्ले पाहिजे. या फळात व्हिटामीन सी आणि प्रोटीन असते. यामुळे या फळाचा वापर खाण्यात करावा.

मुग डाळ:

अनेकांच्या आहारात मुग डाळींचा समावेश असतोच. डाळीत प्रोटीनचे प्रमाण जादा असते. यामुळे गृहिणी आहारात रोज डाळ वापरतातच. मुग डाळीत प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते. शिवाय वजन नियंत्रणात येण्यासाठी मुग डाळीचा फायदा होतो.

बदाम :

बदामात प्रोटीनचे प्रमाण जादा असते. नियमीत बदाम खाल्याने शरीरातील प्रोटीनची कमतरता भरून काढते. हिवाळ्यात शरीराला गर्मी ठेवण्यास बदाम फायद्याचे ठरते.

loading image
go to top