पुरणपोळीचे ८ भन्नाट प्रकार; एकदा नक्की ट्राय करुन बघा

पुरणपोळीचे ८ भन्नाट प्रकार; एकदा नक्की ट्राय करुन बघा
Updated on

होळी आणि रंगपंचमी हा अनेकांच्या आवडीचा सण आहे. त्यामुळे या दिवशी खास होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. पुरणपोळी करणं हे वाटतं तितकं सोपं नाही. ती करण्यासाठी मोठा खटाटोप करावा लागतो. त्यामुळे अनेक गृहिणी ही पोळी करण्याचं टाळतात. परंतु, होळीच्या दिवशी नैवेद्यासाठी तरी ही पोळी करावीच लागते. कारण, पुरणपोळीशिवाय हा सण अपूर्ण आहे. महाराष्ट्रात जवळपास ८ ते १० वेगवेगळ्या पद्धतीने ही पोळी करता येते. त्यामुळेच  आज आपण झटपट आणि कोणताही पसारा न करता पुरणपोळी कशी तयार करायची हे पाहुयात. त्याचसोबत पुरणपोळीचे आठ भन्नाट प्रकार कोणते तेदेखील जाणून घेऊयात.

१. कणकेची पुरणपोळी -

अगदी पूर्वीपासून कणकेच्या पीठापासून पुरणपोळी तयार करण्यात येते. हरभरा डाळ आणि गुण याचं सारण करुन ते कणकेच्या पीठात भरलं जातं आणि हलक्या हाताने ही पोळी लाटली जाते. ही अस्सल पारंपरिक पुरणपोळी करणं अत्यंत कठीण आहे. कारण, बऱ्याच वेळा पोळी लाटत असताना ती फुटते आणि त्यातील पुरण बाहेर पडतं. त्यामुळेच याला पर्याय म्हणून अनेक गृहिणी कणकेऐवजी मैदाचा वापर करतात.

२. साखर गुळाची पुरणपोळी -

काही जणांना गुळाची पुरणपोळी आवडत नाही. अशावेळी साखर आणि गुळ समप्रमाणात घेऊन त्याचं सारण तयार करता येऊ शकतं.

३.  फक्त साखरेची पुरणपोळी -

ज्यांना गुळाची पोळी अजिबात आवडत नाही अशांसाठी साखरेपासून तयार केलेली पुरणपोळी करता येऊ शकते. यात गुळाऐवजी साखरेचा वापर करावा. सोबतच किंचितशी हळद मिक्स करावी. त्यामुळे पोळीला एक पिवळसर रंग येतो.

४. खापर पुरणपोळी -

खानदेशातील फेमस प्रकार म्हणजे खापर पुरणपोळी. ही पोळी विशिष्ट आणि पारंपरिक पद्धतीने तयार केली जाते. ही पोळी खास मातीच्या खापराव केली जाते.

५. सत्तूची पुरणपोळी -

ज्या लोकांना पुरणपोळी खाण्याची इच्छा असते. मात्र, डाएट आडवं येतं अशा लोकांनी सत्तूची पुरणपोळी ट्राय करावी. या पोळीमध्ये पोषकतत्व भरपूर असून त्यामुळे वजनदेखील वाढत नाही.

६. मूगडाळ पुरणपोळी -

मूगाची डाळ पचायला हलकी असते. त्यामुळे अनेक जण मूगाच्या डाळीपासून पुरणाची पोळी तयार करतात. 

७. इन्संट पुरणपोळी - 

आजकाल बाजारात इन्स्टंट पुरणपोळी रेडिमिक्स मिळतं. हे रे़डिमिक्स घरी आणून त्यात गरजेप्रमाणे पाणी घाला आणि त्याच सारण करुन ते पोळीत भरा.

८. ड्रायफ्रूट्स पुरणपोळी -

ज्यांना ड्रायफ्रूट्स खाण्याची आवड आहे त्यांनी सुकामेव्याची पूड तयार करुन ती पुरणाच्या सारणात टाकावी आणि त्यापासून पुरणपोळी तयार करावी.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com