
घावन पचायला हलकी चव देणारी. मांस, रक्त, धातू वाढवणारी. घातले शक्ती देणारे अशक्त पणा कमी करणारे. वात कमी करून शरीराला शुद्ध ठेवणारे आहे.
भाद्रपद शुक्ल नवमी. गुरुवारी (ता. २७) सोनपावल्यांनी घरी येऊन घरगुती गणेशोत्सवामध्ये आनंद भरणाऱया ज्येष्ठागौरींचे विसर्जन होत आहे. या उत्सवी वातावरणात घावन घाटले आपण करायला हवे. हे दोन पदार्थ आहेत.
साहित्य : तांदळाचे पीठ. ओले खोबरे. गुळ. नारळाचे दूध. वेलची पूड. मीठ
कृती : घावन-एक कप तांदळाच्या पीठात दोन कप पाणी घालावे.चवीनुसार मीठ घालून नीट एकजीव करून घ्यावे. तवा चांगला तापला की. त्यावर धीरड्यासारखे पातळ पसरवावे. झाकण ठेवून दोन मिनिटे शिजू द्यावे व उलटवून परत शिजवावे. छान जाळी पडते.
कृती : घाटले- एक कप तांदळाच्या पीठात एक कप नारळाचे दूध. एक मोठा चमचा ओल्या नारळाचा किस. एक मोठा चमचा गुळ व चमचाभर वेलची पूड टाकून एकत्र करणे. गॅसवर शिजवत ठेवणे. गुळ विरघळला की गॅस बंद करणे.घाटले तयार होते. घावन घाटले चविष्ट लागते.
आयुर्वेदीय गुणधर्म : घावन पचायला हलकी चव देणारी. मांस, रक्त, धातू वाढवणारी. घातले शक्ती देणारे अशक्त पणा कमी करणारे. वात कमी करून शरीराला शुद्ध ठेवणारे आहे.