
वर्ष ऋतूमध्ये अति गोड पुराणाचे पदार्थ निषिद्ध असून या पदार्थात पचायला हलके असणारे शक्ती देणारे पोषण करणारे मूग आहेत. वातनाशक असे इतर पदार्थ असल्याने बळ वाढवणारे मांस पेशींना शक्ती देणारे शरीरतील आद्रता कमी करणारे आहेत.
ज्येष्ठा गौरींचे सोनपावलांनी भाद्रपद शुल्क सप्तमीला आगमन झालयं. भाद्रपद शुक्ल अष्ठमी बुधवारी (ता. २६) ज्येष्ठा गौरींचे पूजन. त्यानिमित्ताने आपल्या घरामध्ये मुगाच्या पुरणपोळीचे भोजन करायला हवे.
साहित्य : मूग डाळ अर्धा किलो. गुळ पाव किलो. कणीक. तेल. जायफळ पूड.
कृती : मूगडाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये दोन शिट्ट्या करून शिजवून घ्यावे. पाणी काढून टाकावे. थोडी गार झाल्यावर त्यात बारीक केलेला गुळ घालून एकत्र शिजवावे. गार झाल्यावर जायफळ पूड टाकणे. कणीक वस्त्रगाळ करून तेलाचे मोहन टाकून भिजवणे. चार-पाच तास भिजवून ठेवलेल्या कणकीत पुरण घालून पोळ्या कराव्यात.
औषधी गुणधर्म : वर्ष ऋतूमध्ये अति गोड पुराणाचे पदार्थ निषिद्ध असून या पदार्थात पचायला हलके असणारे शक्ती देणारे पोषण करणारे मूग आहेत. वातनाशक असे इतर पदार्थ असल्याने बळ वाढवणारे मांस पेशींना शक्ती देणारे शरीरतील आद्रता कमी करणारे आहेत.