रेसिपी : केळीच्या पानावरील पाणगी

वैद्य विक्रांत जाधव 
Friday, 28 August 2020

पाणगे हा पचायला हलका. तत्काळ शक्ती देणारा, थकवा दूर करणारा, रस धातू वाढवणारा, रक्त धातू पोषण करणारा आहे. गरोदर महिला, आजी-आजोबा, मुलांसाठी उत्तम टॉनिक. केशवर्धक आहे. मल साफ करणारा आहे. 
 

भाद्रपद शुक्ल एकादशी, शनिवार (ता. २९). गणेशोत्सवातील आठवा दिवस. सध्यस्थितीत ढगाळ हवामान आणि रिमझिम पाऊस असे वातावरण आहे. अशावेळी पचायला हलके आणि शक्तीवर्धक केळीच्या पानावरील पाणगी आपण घरी करायला हवी. 

साहित्य : तांदळाचे पीठ. साखर. मीठ. नारळाचे दूध. केळीचे पान. 

कृती : एक कप तांदळाचे पीठ घेवून त्यात एक चमचा मीठ घालावे. पाव कप साखर त्यात मिसळावी. मिश्रण एकजीव करावे. नंतर त्यात दोन कप नारळाचे दूध घालून एकजीव करावे. साधारणपणे भज्यांच्या पीठाइतके पातळ करून घ्यावे. गॅसवर तवा तापत ठेऊन त्यावर केळीचे पानाचा तुकडा पसरवणे. त्यावर पीठ नीट पसरावे व वरून पुन्हा परत केळीचे पान ठेवावे. एका बाजूने छान शिजल्यावर परत उलटवणे व दुसरीकडून शिजवून घ्यावे. कमी गोड असे पाणगे तयार होतात. 

उपयोग : पाणगे हा पचायला हलका. तत्काळ शक्ती देणारा, थकवा दूर करणारा, रस धातू वाढवणारा, रक्त धातू पोषण करणारा आहे. गरोदर महिला, आजी-आजोबा, मुलांसाठी उत्तम टॉनिक. केशवर्धक आहे. मल साफ करणारा आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: how to make pagani nashik Marathi recipe