रेसिपी : खव्याची साटोरी 

वैद्य विक्रांत जाधव 
Monday, 24 August 2020

साटोरी ही पोष्ठिक असून धातू वर्धन करणारी आहे. घरातील सर्वांसाठी ते उत्तम टॉनिक आहे. गर्भवती, वृद्ध-मुलसाठी उपयुक्त आहे. 
 

भाद्रपद शुल्क सप्तमी. ज्येष्ठागौरींचे मंगळवारी (ता. २५) आवाहन होईल. त्यानिमित्ताने चवदार पौष्टीक साटोरी घरोघरी करायला हवी. चला, तर मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि कृतीसह औषधी गुणधर्म आपण पाहू यात! 

साहित्य : पाव किलो खवा. पिठीसाखर एक वाटी. वेलची पूड. कणीक एक वाटी अर्धा वाटी रवा. मीठ. 

कृती : प्रथम खवा पातेल्यात घेऊन गरम करून घेणे. थोडा पातळ झाल्यावर त्यात साखर घालणे. साखर विरघळली की गॅस बंद करून मिश्रण पूर्णपणे गार होऊ द्यावे. पुरीसाठी कणीक व रवा एकत्र करून तेल व मीठ घालून चांगले मळून घ्यावे. ओल्या कपड्याखाली झाकून ठेवावे. नंतर खव्याचे लहान पेढ्यासारखे गोळे करावे. कणीक छान मळून तिचे लहान गोळे करावे. पुरीइतकी पारी लाटून त्यात खव्याचा गोळा घालून व्यवस्थित बंद करावे व हलक्या हाताने लाटून घ्यावे. नंतर तवा तापवून त्यावर ती दोन्ही बाजूंनी थोडी भाजून घ्यावी. गार झाली ती तेलात तळून घ्यावी. तव्यावर भाजल्याने खव्याचे सारण बाहेर येत नाही. खुसखुशीत साटोरी होते. 

औषधी गुणधर्म: साटोरी ही पोष्ठिक असून धातू वर्धन करणारी आहे. घरातील सर्वांसाठी ते उत्तम टॉनिक आहे. गर्भवती, वृद्ध-मुलसाठी उपयुक्त आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: how to make satori nashik marathi recipe