रेसिपी : दक्षिणी सुंदल (नैवेद्यामध्ये अग्रस्थानी)

वैद्य विक्रांत जाधव 
Sunday, 30 August 2020

वरद लक्ष्मी व गणपतीच्या नैवेद्यामध्ये सुंदलला महत्व आहे. सुंदल हा एक थोडासा तिखट भूख वाढवणारा पदार्थ आहे. 

सुंदल हा दक्षिणी पदार्थ आहे. नैवेद्यामध्ये अग्रस्थानी असलेला. भाद्रपद शुक्ल द्वादशी अर्थात सोमवार (ता. ३१). अनंत चतुदर्शीच्या आदल्या दिवशी आपल्या घरात हा पदार्थ करायला हवाच. 

साहित्य : १ ते २ कप हरभराडाळ अथवा हिरवे मूगडाळ अथवा हिरवे ताजे वाटाणे, १ ते २-३ ते ४ कप पाणी, एक ते दोन चमचा शुद्ध तूप, एक ते दोन चमचा चमचा मोहरी, एक चमचा उडीदडाळ, एक ते दोन चमचा जिरे, एक ते दोन लाल मिरच्या तोडून, एक ते दोन चमचा किसलेले आले, दोन चिमूट हळद, हिंग, मीठ चवीप्रमाणे व २ चमचे ताजा खवलेला नारळ. 

कृती : ज्या डाळीचे सुंदल करायचे असेल ती डाळ चांगली धुणे व शुद्ध पाण्यामध्ये रात्रभर अथवा किमान ४ तास भिजवणे. नंतर पाणी काढून कुकरमध्ये २ ते ३ शिट्ट्या द्याव्यात. हरभराडाळीला ४ शिट्ट्या लागतील. पॅनमध्ये तूप तापवावे व त्यामध्ये उडीद, मोहरी, जिरे टाकून परतावे. कडीपत्ता व मिरच्या टाकून हिंग व आले टाकावे. डाळीतील पाणी काढून डाळ, हळद व मीठ त्यामध्ये टाकणे. शेवटी वरून खवलेला नारळ टाकावा. मस्त सुंदल तयार नैवेद्य गणेशाला दाखवावा. 

औषधी गुणधर्म: वरद लक्ष्मी व गणपतीच्या नैवेद्यामध्ये सुंदलला महत्व आहे. सुंदल हा एक थोडासा तिखट भूख वाढवणारा पदार्थ आहे. पौष्टीक पण पचायला हलका, चव देणारा, मांसपेशी बळकट करणारा, वात कमी करणारा आहे. पावसाळ्यातील व्याधींना प्रतिबंध करणारा आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: how to make sundal nashik marathi recipe