रेसिपी : रव्याचे गोड आप्पे 

वैद्य विक्रांत जाधव 
Thursday, 27 August 2020

आप्पे हे पचायला हलके. चवदार आणि पौष्टिक असून चवदार मांसवर्धक आहे. सात्विक आहे. सर्वांना आवडणारा खाता येणारा पदार्थ होय. गर्भवतीसाठी विशेष उपयुक्त. 

 
भाद्रपद शुक्ल द्वादशी शुक्रवार (ता. २८). गणेशोत्सवाचा सातवा दिवस. चला, तर मग आपण तयार करु यात, रव्याचे गोड आप्पे. आप्पे हा प्रकार करायला सोपा आणि तेल नसलेला खाद्यपदार्थ. 

साहित्य : बारीक रवा. गूळ. खोबरे. तूप. दूध 

कृती : एक वाटी रवा, दोन वाटी दूधात चार तास भिजवून ठेवणे. नंतर त्यात खोब-याचे तुकडे घालून त्यात एक वाटी चिरलेला गूळ घालावा. हे मिश्रण एकजीव करून घ्यावे. आप्पे पात्राला तूप लावून त्यात एक चमचा मिश्रण घालून झाकण ठेऊन शिजवावे. अगदी लवकर शिजतात. प्रत्येक आप्पा दुसऱ्या बाजूने शिजण्यासाठी उलथवणे. खमंग आप्पे तयार होतात. 

औषधी गुणधर्म : आप्पे हे पचायला हलके. चवदार आणि पौष्टिक असून चवदार मांसवर्धक आहे. सात्विक आहे. सर्वांना आवडणारा खाता येणारा पदार्थ होय. गर्भवतीसाठी विशेष उपयुक्त. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: how to make sweet appe nashik marathi recipe