रेसिपी : वाटली डाळ 

वैद्य विक्रांत जाधव 
Monday, 31 August 2020

चवदार-तिखट, पचायला तसा जड होतो. जर त्यावर पाणी प्याले तर. पौष्ठिक, जिभेला चव आणणारा मांसवर्धन करणारा, शक्ती वाढवणारी आहे.

गणरायाला भाद्रपद शुक्ल चतुर्दशी मंगळवारी (ता. १) आपण निरोप देणार आहोत. निरोपासाठी आपण एक विशेष पदार्थ करायला हवा. तो म्हणजे, वाटलेली डाळ 

साहित्य : हरभरा डाळ पाव किलो. तेल. आले. हिरवी मिरची. हळद. हिंग. मोहरी. मीठ. कोथिंबीर. ओले खोबरे. कढीपत्ता. लिंबू 

कृती : हरभरा डाळ स्वच्छ धुवून सहा तास पाण्यात भिजत ठेवणे. पाणी काढून निथळून घेणे. डाळ, हिरवी मिरची, आले मिक्सरमध्ये थोडे जाडसर पाणी न घालता वाटावे. नंतर ते कुकरमध्ये वाफवून घ्यावे. पूर्ण गार झाल्यावर हाताने कुस्करून मोकळे करावे. पातेल्यात जरा जास्त तेल घालून हिंग मोहरीची फोडणी देणे. त्यात कढीपत्ता घालावा व कुसकरलेली डाळ घालावी. चवीनुसार मीठ टाकणे व चांगल्या दोन वाफा येऊ द्याव्यात. मग लिंबाचा रस घालावा. वरून कोथिंबीर व ओले खोबरे घालून खावे. 

औषधी गुणधर्म : चवदार-तिखट, पचायला तसा जड होतो. जर त्यावर पाणी प्याले तर. पौष्ठिक, जिभेला चव आणणारा मांसवर्धन करणारा, शक्ती वाढवणारी आहे. ही वाटली डाळ नाशिकमधील प्रसिद्ध. वजन न वाढवणारी आहे. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: how to make vatali daal marathi recipe