गटारीच्या दिवशी घरीच करा चिकन लॉलीपॉप

जाणून घ्या, चिकन लॉलीपॉपची रेसिपी
गटारीच्या दिवशी घरीच करा चिकन लॉलीपॉप
Updated on

नॉनव्हेजमधील सगळ्यात आवडता पदार्थ कोणता असा प्रश्न विचारला तर अनेकांचं उत्तर चिकन लॉलीपॉप असंच येईल. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण लॉलीपॉप आवडीने खातात. परंतु, दरवेळी असे पदार्थ खाणं हे आरोग्याच्या दृष्टीने आणि आर्थिकदृष्ट्याही परवडणारे नसतात. म्हणूनच, यंदाच्या गटारीला चिकन लॉलीपॉप बाहेरुन विकत आणण्यापेक्षा घरीच कसे करायचे ते पाहुयात. (how to cook chicken lollipop at home)

साहित्य -

चिकन पीस -१० ( चिकनच्या दुकानातून लॉलीपॉपसाठीचे वेगळे पीस मिळतात.)

मैदा -२ चमचे

कॉर्नफ्लोअर - १ चमचे

आलं-लसूण-मिरची पेस्ट - १ चमचा

अंडी -१

सोया सॉस -अर्धा चमचा

मिरपूड - अर्धा चमचा

मीठ -चवीनुसार

तेल - तळण्यापूरतं

अ‍ॅल्युमिनियम फॉईलचे छोटे तुकडे

गटारीच्या दिवशी घरीच करा चिकन लॉलीपॉप
जाणून घ्या, गटारी अमावस्या साजरी करण्याची वेळ

कृती -

प्रथम चिकनचे तुकडे स्वच्छ पाण्यातून ३ ते ४ वेळा धुवून घ्या. (चिकनच्या दुकानात लॉलीपॉपसाठी वेगळे पीस करुन देतात.) त्यानंतर साहित्यात दिलेले पदार्थ मिक्स करा. ( तेल वगळून) आता हे सगळे पदार्थ चिकनसोबत छान मिक्स करुन घ्या व साधारणपणे १ तास चिकन मुरत ठेवा. (लॉलीपॉपला हॉटेलप्रमाणे लाल रंग हवा असल्यास खायचा रंग मिश्रणात टाकू शकता.)

एक तासानंतर कढईत मिडीअम फ्लेमवर तेल तापवून घ्या व चिकनचे तुकडे लालसर होईपर्यंत तळून घ्या. मंद आचेवरच सगळे लॉलीपॉप तळू घ्या. त्यानंतर चिकन प्लेटमध्ये काढून त्याच्या हाडांभोवती अ‍ॅल्युमिनिअम फॉइल पेपर गुंडाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com