आता हॉटेलची काय गरज? घरीच करा झणझणीत कोल्हापुरी मिसळ

जाणून घ्या, कोल्हापुरी मिसळ कशी करावी
आता हॉटेलची काय गरज? घरीच करा झणझणीत कोल्हापुरी मिसळ

कोल्हापूर म्हटलं की डोळ्यासमोर सगळ्यात प्रथम येतो तो पदार्थ म्हणजे झणझणीत कोल्हापुरी मिसळ आणि तांबडा-पांढरा रस्सा. खरंतर आता प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची मिसळ मिळते. परंतु, कोल्हापुरी मिसळची जी चव आहे ती अन्य कोठेही नाही. म्हणूनच, अनेक जण ही मिसळ घरी करण्याचा प्रयत्न करतात. परंतु, बऱ्याचदा ती फसते. म्हणूनच, परफेक्टरित्या कोल्हापुरी मिसळ कशी करावी ते पाहुयात. (how to cook kolhapuri misal)

साहित्य -

३० मिनिटे

भिजवलेली मटकी - २ वाट्या

कांदा - ४ (मोठे)

ओलं खोबरं - २ वाट्या

सुके खोबरे - १ वाटी

आलं - २ इंच

लसूण - वाटीभर

कोथिंबीर

कोल्हापुरी कांदा-लसूण चटणी - २ चमचे

गरम मसाला - १ चमचा

लवंग -६

दालचिनी -१ इंच

काळे मिरे -६

धणे-जिरे - २ चमचे

बटाटा -१

फोडणीचं साहित्य

फरसाण

कृती -

सगळ्यात प्रथम तेल गरम करुन त्यात हळद,हिंग घालून त्यावर मटकी व बटाटे घालून परतून घ्यावं. २ मिनिटांनी त्यात पाणी, तिखट, मीठ घालून ३ शिट्ट्या कराव्यात. (मटकी जास्त शिजवू नये.)

कट तयार करण्यासाठी -

प्रथम २ कांदे उभे चिरुन तेलावर भाजून घ्या. कांदा भाजत असताना त्यात ओलं-सुकं खोबर व गरम मसाला टाका आणि तेदेखील छान परतून घ्या. तयार झालेलं हे मिश्रण थोडं गार करा व मिक्सरमध्ये त्याची बारीक पेस्ट करुन घ्या. ही पेस्ट शक्यतो जाडसरच ठेवा. आता एका जाड बुडाच्या पातेल्यात तेल (नेहमीपेक्षा थोडं जास्त) गरम करुन त्यात हळद, हिंग,२ कांदे उभे चिरून, कोल्हापुरी चटणी टाका व छान परतून घ्या. आता कांदा किंचित मऊ झाल्यावर त्यात कांदा-खोबऱ्याचं वाटलेलं वाटण, मीठ घाला. त्यानंतर गरजेनुसार पाणी घालून छान उकळी आणा.

मिसळची प्लेटिंग करताना

एका डिशमध्ये फरसाण घेऊन त्यावर शिजलेली मटकी व तयार कट घाला. यावर कच्चा कांदा व लिंबू पिळा आणि पावासोबत सर्व्ह करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com