Diwali Festival : असा बनवा मक्याच्या पोह्यांचा चिवडा

Diwali Festival : असा बनवा मक्याच्या पोह्यांचा चिवडा

पुढच्या आठवड्यात दिवाळी आलीय. चिवडा, लाडू, चकली करण्यासाठी आता अनेकांकडे सामानही आणले गेले असेल. घराघरात फराळाच्या पदार्थांचा सुगंध दरवळेल. चिवड्याशिवाय दिवाळीची पुर्तताच नाही. अनेक घरात मक्याच्या पोह्यांचा चिवडा करतात.

साहित्य- मक्याचे पोहे पाव किलो, शेंगदाणे 100 ग्रॅम, पंढरपुरी डाळे 100 ग्रॅम, तेल, मीठ चवीनुसार, पिठीसाखर पाव वाटी वाटी, हिरव्या मिरचीचा ठेचा दोन चमचे, लाल तिखट 1 ते दीड चमचा, तीळ दोन चमचे, सायट्रिक अॅसिड (लिंबू सत्व)अर्धा चमचा, जिरेपूड एक चमचा, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता.

कृती- कढईत दोन चमचे तेल घालून त्यावर मक्याचे पोहे, पाव चमचा मीठ घालून खमंग भाजून घ्या. भाजलेले पोहे कागदावर पसरून ठेवा. अशाप्रकारे सर्व पोहे भाजून घ्या. नंतर तेल तापल्यावर शेंगदाणे तळून घ्या. कढईत एक ते दीड वाटी तेल ठेवून उरलेले तेल बाजूला ठेवा. कढईतील तेलात मोहरी, कढीपत्ता, मिरची ठेचा, सायट्रिक अॅसिड घाला. सर्व तडतडायचे थांबल्यावर हिंग, हळद घालून फोडणी करा. कागदावरचे मक्याचे पोहे परातीत किंवा मोठ्या पातेल्यात घेऊन त्यावर डाळे ( न भाजता, तळता), तळलेले शेंगदाणे घाला. त्यावर लाल तिखट, चवीनुसार मीठ, पिठीसाखर घालून जिरेपूड घाला. सर्व मिश्रण कालवून वरून अंदाज घेत फोडणी ओता. सर्व मिश्रण नीट एकत्र करा. चव घेऊन आवश्यकतेनुसार साखर, मीठ, तिखट वाढवा.
(संदर्भ: पुस्तक-मराठी सण...मराठी रेसिपी, सकाळ प्रकाशन, लेखिका-अश्विनी अजित डिके

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com