esakal | वजन कमी करायचंय, आठवड्यातून दोनदा खा नाचणीची भाकरी
sakal

बोलून बातमी शोधा

वजन कमी करायचंय, आठवड्यातून दोनदा खा नाचणीची भाकरी

वजन कमी करायचंय, आठवड्यातून दोनदा खा नाचणीची भाकरी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

आपल्या आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश असतो, तर अनेकांना बाजरीची भाकरी खायलाही आवडते, गव्हाच्या चपात्याही आपल्याला आहाराचा नियमित भाग असतात. पण तुम्ही कधी नाचणीची भाकरी खाऊन पाहिली आहे का? जर नसेल तर आठवड्यातून दोनदा तुमच्या आहारात नाचणीच्या भाकरीचा समावेश करुन पहा. वजन कमी करण्याव्यतिरिक्त नाचणीची भाकरी पचनासाठीही खूप चांगली असते. नाचणीच्या भाकरी कशी बनवतात हे आपण जाणून घेणार आहोत.

साहित्य- ३ कप नाचणीचे पीठ, १ बारीक चिरलेला कांदा, १ किसलेले गाजर, १० बारीक केलेली कढीपत्त्याची पाने, १ पेंडी बारीक चिरुन घेतलेली कोथिंबीर, १ चमचा जिरे, १ चमचा तीळ, १ कप पाणी, पाव चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मीठ.

कृती-

प्रथम पाणी वगळता सर्व साहित्य एकत्र करुन त्यावर थोडं पाणी शिंपडा आणि ते नाचणीच्या पीठात मिक्स करा. नंतर त्यात पाणी घालून पीठ मळून घ्या म्हणजे त्याची कणिक बनेल. त्यानंतर या कणकीचे गोळे बनवून घ्या.

आता एक चौरसाकृती सुती कापड घ्या. आपण स्वच्छ धुवून घेतलेला रुमालही वापरू शकता. कापड भिजवण्यासाठी एका भांड्यात पाणी घ्या. त्यात कापड भिजवल्यानंतर नीट पिळून घ्या आणि एका सपाट पृष्ठभागावर पसरा. यानंतर नाचणीच्या कणकेचा गोळा त्याच्या मध्यभागी ठेवा, आता जशा इतर भाकरी थापतो तशी तळहाताने गोलाकार आकारात भाकरी थापून घ्या.

जर भाकरी चिकट वाटत असेल तर आपण तिला थोडं पाणीही लावू शकता. भाकरीचा आकार आणि जाडी तुम्हाला हव्या त्यानुसार बनली की ती थापणे थांबवा. आता गॅसवर तवा ठेवा. तवा गरम झाल्यावर मग गॅस मध्यम आचेवर ठेवा.

आता कापड कडांना धरून उचलून घ्या. कापड हळूवारपणे काढा, जेणेकरून भाकरी सहजपणे तव्यावर जाऊ शकेल. आता गॅस वाढवा. झाकण हटवा आणि दुसऱ्या बाजूनेही भाकरी भाजून घ्या. १-२ मिनिटे भाकरीला भाजून घ्या. आता भाकरीचा रंग बदलल्याचे तुम्हाला दिसेल. तुमची नाचणीची भाकरी आता तयार झालीये.

loading image
go to top