Potato chilla Recipe : बेसन चिला खाऊन कंटाळलात? मग, नाश्त्याला बनवा बटाटा चिला, एकदम सोपी आहे रेसिपी

Potato chilla Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये रोज काय बनवावे? असा प्रश्न बहुधा सगळ्यांनाच पडतो. रोजच्या नाश्त्यामध्ये आपण विविध पदार्थ बनवण्यावर भर देतो. अनेकांना हेल्दी आणि टेस्टी नाश्ता हवा असतो.
Potato chilla Recipe
Potato chilla Recipeesakal

Potato chilla Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये रोज काय बनवावे? असा प्रश्न बहुधा सगळ्यांनाच पडतो. रोजच्या नाश्त्यामध्ये आपण विविध पदार्थ बनवण्यावर भर देतो. अनेकांना हेल्दी आणि टेस्टी नाश्ता हवा असतो. मात्र, कधीकधी सकाळी उठायला उशिर झाला की, मग धांदल उडते. नाश्त्यामध्ये झटपट काय करावे? असा प्रश्न पडतो.

मात्र, आता तुम्ही चिंता करण्याची गरज नाही. कारण, सकाळी उशिरा जरी झाला तरी सुद्धा तुम्ही अवघ्या १० मिनिटांमध्ये हे रेसिपी नाश्त्याला बनवू शकता. या रेसिपीचे नाव आहे बटाट्याचा चिला. चला तर मग जाणून घेऊयात ही सोपी रेसिपी.

Potato chilla Recipe
Healthy Breakfast Recipe : नाश्त्याला बनवा मुळ्याचा पराठा, एकदम सोपी आहे रेसिपी

बटाट्याचा चिला बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • २ बटाटे – किसून घेतलेले

  • २-३ हिरव्या मिरच्या

  • मीठ

  • १ कांदा बारीक चिरलेला

  • कोथिंबीर बारीक चिरलेली

  • बेसनपीठ

  • जिरे पावडर – १ चमचा

  • चिमूटभर हळद

  • आले-लसणाची पेस्ट – १ चमचा

  • तूप किंवा तेल

बटाट्याचा चिला बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • सर्वात आधी बटाटे स्वच्छ धुवा. त्यानंतर, बटाटे सोलून ते किसून घ्या.

  • किसलेला बटाट्यातील पाणी काढून घ्या.

  • त्यानंतर, किसलेल्या बटाट्यामध्ये जिरेपूड, आले-लसणाची पेस्ट, हळद, मीठ, बेसनपीठ, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर मिसळा.

  • आता हे चांगल्या प्रकारे मिक्स करून सेट करायला ठेवा. यामध्ये आवश्यकता असल्यास तुम्ही अधिकचे बेसनपीठ मिसळू शकता.

  • आता यामध्ये थोडे पाणी मिसळा आणि काही वेळासाठी हे मिश्रण असेच ठेवा.

  • आता या मिश्रणात जर तुम्हाला जास्त पाणी वाटत असेल तर, तुम्ही त्यात आणखी बेसन घालू शकता.

  • दुसऱ्या बाजूला तवा किंवा पॅन गॅसवर गरम करायला ठेवा. नंतर, त्यात तेल टाकून, ते पसरून घ्या.

  • त्यानंतर, बटाटा-बेसनचे हे मिश्रण तव्यावर ओतून शक्य तितके पातळ होईपर्यंत पसरवा. त्यानंतर, या चिल्याभोवती तेल पसरून दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत छान भाजून घ्या.

  • तुमचा बटाट्याचा चिला तयार आहे. हा चिला तुम्ही हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता.

Potato chilla Recipe
Healhy Breakfast Recipie : सकाळच्या नाश्त्यामध्ये ट्राय करा, ‘हे’ हेल्दी आणि टेस्टी सॅंडवीच, दिवसभर राहील एनर्जी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com