Soyabean Cutlet Recipe : नाश्त्याला बनवा टेस्टी आणि हेल्दी सोयाबीन कटलेट्स, एकदम सोपी आहे रेसिपी

Soyabean Cutlet Recipe : सोयाबीन खायला सगळ्यांनाच आवडते. आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या सोयाबीनपासून विविध प्रकारच्य डिशेस बनवल्या जातात.
Soyabean Cutlet Recipe
Soyabean Cutlet Recipeesakal

Soyabean Cutlet Recipe : सोयाबीन खायला सगळ्यांनाच आवडते. सोयाबीनपासून विविध प्रकारच्य डिशेस बनवल्या जातात. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात तुम्ही सोयाबीनपासून बनवले जाणारे विविध खाद्यपदार्थ बनवता.

मात्र, तुम्हाला हे माहित आहे का? की सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही सोयाबीनपासून बनवला जाणारा सोपा आणि चविष्ट पदार्थ खाऊ शकता. या पदार्थाचे नाव आहे सोयाबीन कटलेट्स.

सकाळच्या नाश्त्यामध्ये नेहमीच पोहे, उपमा, इडली खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल तर तुम्ही सोयाबीनचे कटलेट्स नक्कीच बनवू शकता. सोयाबीनचे हे कटलेट्स बनवण्यासाठी तुम्हाला जास्त साहित्याची गरज भासत नाही.

शिवाय, सोयाबीन हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे, नाश्त्यामध्ये काहीतरी हेल्दी आणि टेस्टी खाण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. चला तर मग जाणून घेऊयात या सोयाबीन कटलेटची रेसिपी.

Soyabean Cutlet Recipe
Healthy Breakfast Recipe : नाश्त्याला बनवा कुरकुरीत आणि जाळीदार दुधी भोपळ्याचा डोसा, एकदम सोपी आहे रेसिपी

सोयाबीन कटलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे :

  • सोयाबीन – २ वाट्या (भिजवलेले)

  • बटाटा – १ उकडलेला

  • ब्रेडचा चुरा – १ वाटी

  • कांदा – अर्धी वाटी चिरून

  • आले-लसणाची पेस्ट

  • अर्धा चमचा हळद

  • मीठ चवीनुसार

  • हिरवी मिरची बारीक चिरलेली

  • तेल

  • बेसन ३-४ चमचे

सोयाबीन कटलेट बनविण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे

  • सर्वात आधी उकडलेले बटाटे चांगल्या पद्धतीने स्मॅश करून घ्या आणि एका भांड्यात झाकून ठेवा.

  • त्यानंतर, भिजवलेले सोयाबीन मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्या.

  • आता हे बारीक केलेल्या सोयाबीनचे मिश्रण बटाट्यामध्ये घालून चांगले स्मॅश करा.

  • आता या मिश्रणात आले-लसणाची पेस्ट, मीठ, हळद, हिरवी मिरची आणि कांदा घाला.

  • हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. त्यानतंर, त्यात बेसन घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या.

  • या मिश्रणापासून गोल किंवा तुम्हाला हव्या त्या आकारात कटलेट बनवा.

  • आता दुसऱ्या बाजूला गॅसवर कढई किंवा पॅन गरम करायला ठेवा. त्यानंतर, त्यात तेल घाला.

  • आता सोयाबीन कटलेट ब्रेडच्या चुऱ्यामध्ये बुडवून नंतर ते गरम तेलात तळून घ्या.

  • सोनेरी होईपर्यंत कटलेट तळून घ्या. त्यानंतर, गरमागरम सर्व्ह करा.

  • टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत खायला घ्या.

Soyabean Cutlet Recipe
Healthy Breakfast Recipe : नाश्त्यामध्ये बनवा अंड्याचा स्वादिष्ट पराठा, एकदम सोपी आहे रेसिपी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com