रेसिपी : टर्किश लॅन्टील सूप|Winter Special Recipe | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेसिपी : टर्किश लॅन्टील सूप

रेसिपी : टर्किश लॅन्टील सूप

sakal_logo
By
टीम ई सकाळ

प्रज्ञा जोग, पुणे
थंडी सुरू झाली आहे. यावेळी काहीतरी गरमागरम खावसं वाटतं. तेव्हा सूप हा उत्तम पर्याय आहे. या काळात भाज्या मुबलक प्रमाणात आणि फ्रेश असतात. पण तुमच्याकडे जर भाज्या उपलब्ध नसतील आणि गरमागरम काहीतरी प्यायची इच्छा असेल तर हे मसुराच्या डाळीचे सूप उत्तम पर्याय आहेय एक तर ते पौष्टीकही आहे आणि पोटभरीचेही. त्यामुळे या हिवाळ्यात हे सूप नक्की प्या.

साहित्य- मसूर डाळ किंवा अख्खे मसूर- १/४ कप, गाजर - 2 लहान, ठेचलेली लसूण - १/२ टीस्पून, पुदिना- १ मोछा चमचा तेल - १/२ टीस्पून (शक्यतो ऑलिव्ह), मीठ, लाल मिरची फ्लेक्स.

कृती- कुकरमध्ये मसूर डाळ, गाजर पुदीना शिजवून घ्या. तो गार झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्या. एका भांड्यात तेल, लसूण, हळद पावडर घालून परता. त्यात मिक्सरमधून काढलेले मिश्रण घाला. मीठ आणि लाल मिरची फ्लेक्स घाला. जर हे सूप आणखी चविष्ट करायचे अशेल तर तर एका पॅनमध्ये थोडे बटर घालून त्यात बारीक चिरलेला लसूण सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या, त्यानंतर ते सूपवर घाला. तुमचे सूप आणखी चविष्ट लागेल.

loading image
go to top