Recipe: मूगडाळीचे पौष्टिक आप्पे कसे तयार करायचे ? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mung daal appe

Recipe: मूगडाळीचे पौष्टिक आप्पे कसे तयार करायचे ?

हिरवी मूगडाळ आणि पालक घालून केलेले हे आप्पे खायला अतिशय पौष्टिक राहणार आहोत तसेच चवीलाही अगदी खमंग आणि रूचकर लागतात आहेत.त्यामुळे सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी तुम्ही हे आप्पे करू शकता. चला तर मग आजच्या लेखात मूगडाळीचे पौष्टिक आप्पे कसे तयार करायचे ? याची सविस्तर रेसिपी बघू या..

साहित्य :

● एक वाटी हिरवी मुगाची डाळ

● अर्धा वाटी पोहे

● अर्धा चमचा मेथीदाणे

● एक वाटी बारीक चिरलेला पालक

● लसणाच्या पाकळ्या

● दोन हिरव्या मिरच्या

● आल्याचा तुकडा

● एक चमचा जिरं

● अर्धा वाटी ताक

● बारीक चिरलेला कांदा

● अर्धा चमचा इनो

● मीठ

● तेल

हेही वाचा: Sunday Special Recipe: ट्राय करा, चिकन चीज बॉल्स

कृती :

मुगाची डाळ आणि पोहे तिन ते चार वेळा स्वच्छ धुऊन घ्यावे. मूगडाळ, पोहे आणि मेथीदाणे एकत्र करून चार ते पाच तास भिजत घाला. नंतर डाळ उपसून घेऊन त्यात आलं, मिरची, लसूण, पालकाची पाने आणि जिरं घालून बारीक वाटून घ्यावे.

वाटताना पाण्याच्या ऐवजी लागेल तसं ताक घालून वाटून घ्यावे.

हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घ्यावे.

त्यात चवीप्रमाणे मीठ आणि बारीक चिरलेला कांदा घालून मिक्स करावा.

आप्पेपात्रात तेल घालून गरम होऊ द्यावे.

हेही वाचा: Egg Lollipop Recipe: घराच्या घरी क्रिस्पी एग लॉलीपॉप कसे तयार करायचे?

तेल गरम होईपर्यंत पीठात इनो टाकून ते ढवळून घ्यावे.आप्पेपात्राच्या वाट्यांमध्ये एकेक टेस्पून बॅटर घालून झाकण ठेवावे. गॅस मध्यम आचेवर ठेवावा.

साधारण पाच मिनिटांत खालची बाजू झाली की आप्पे उलटून घ्यावे.

परत दोन चार मिनिटे झाकण ठेवा.

आप्पेपात्र खूप तापलं असेल तर गॅस कमी करावा.

बाहेरून छान कुरकुरीत आणि आतून मऊ, छान जाळी पडलेले असे हे आप्पे होतात.

टिप - जर तुमच्याकडे ताक उपलब्ध नसेल तर एक दोन चमचे दही घालून मग लागेल तसं पाणी घातलं तरी चालु शकतं.

Web Title: How To Prepare Nutritious Appe Of Mung Daal

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..