ग्लॅम-फूड : ‘मी सामोसाप्रेमी’ | Hrithik Roshan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hrithik roshan
ग्लॅम-फूड : ‘मी सामोसाप्रेमी’

ग्लॅम-फूड : ‘मी सामोसाप्रेमी’

- हृतिक रोशन

हृतिक रोशनला भारतीय पद्धतीचे खाद्यपदार्थ आवडतात. भारतीय पद्धतीने बनवलेल्या सगळ्याच भाज्या तो आवडीने खातो. याशिवाय त्याला मेक्सिकन, चायनीज, इटॅलियन आणि जॅपनीज पद्धतीचे खाद्यपदार्थदेखील आवडतात. हृतिक हा बॉलिवूडमधील सगळ्यात फिट अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याच्या फिटनेसचे रहस्य म्हणजे समतोल आहार होय. हृतिक सकाळी नाश्त्याला ताजी फळे, दोन ब्रेड आणि एग व्हाइट्स, प्रोटिन शेक, कॉर्न फ्लेक्स किंवा मोड आलेली कडधान्ये आणि दूध घेतो. दुपारच्या जेवणात पालेभाजी, रोटी आणि दाल आणि सॅलड असा त्याचा आहार असतो. रात्रीच्या जेवणात मीट किंवा फिश, ताजी फळे आणि अंडी असा त्याचा आहार असतो.

हृतिक शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी पितो. दूध, दही, बदाम यांसारखे प्रोटिन-रिच पदार्थ खातो. आपले शरीर निरोगी ठेवण्यासाठी हृतिक आले आणि हळद घातलेले गरम पाणी; तसेच घरगुती काढासुद्धा पितो. घरातील खाद्यपदार्थ ओमेगा ऑइल घालून ते केले असतील याची खबरदारी हृतिक घेतो. याव्यतिरिक्त ब्रोकोली, उकडलेल्या भाज्या, ब्राऊन राइस यांचादेखील त्याच्या आहारात समावेश असतो. एकाच वेळी खूप खाण्यापेक्षा दर तीन तासांनी विशिष्ट प्रमाण असलेला आहार घेण्यावर हृतिकचा भर आहे.

डाएट म्हटले, की आपल्या डोळ्यांसमोर येते लिमिटेड खाणे आणि फास्ट फूड टाळणे. हृतिक मात्र त्याला अपवाद आहे. सामोसा हा त्याच्या फेव्हरेट आहे.

तो एकाच वेळी तब्बल बारा सामोसेसुद्धा फस्त करू शकतो. याशिवाय पिझ्झा, पीनट बटर, नाचोज, पॅन केक्स त्याला आवडतात. ज्या वेळी तो डाएटवर नसतो, त्या वेळी तो आठवड्यातून किमान दोनदा तरी पिझ्झा खातो. हृतिकला स्वयंपाक करता येत नाही; पण ज्यांना स्वयंपाक करता येतो त्यांच्याविषयी त्याला नितांत आदर आहे. त्याची आईच जगातील बेस्ट कूक असल्याचे तो सांगतो. हृतिकची आई भारतीय पद्धतीचे खाद्यपदार्थ उत्तम बनवते. तिच्या हातचे ‘ब्रेड पूडिंग’ त्याला खूप आवडते. याशिवाय तिने केलेले कॅरॅमल कस्टर्डही तो आवडीने खातो. गोड पदार्थांपैकी स्वीट अँपल पाय विथ वॅनिला आइस्क्रीम, ब्राऊनीज विथ आइस्क्रीम, आइस्क्रीम विथ चॉकलेट सॉस यांचा तो चाहता आहे.

loading image
go to top