esakal | नाचणीची इडली
sakal

बोलून बातमी शोधा

Idli of ragi healthy Diet

नाचणीमध्ये ट्रिप्टोफेन नावाचे अमिनो ऍसिड आहे. जे भूक कमी करण्यास मदत करते आणि वजन नियंत्रणात येण्यासाठीही  मदत करते. नाचणी हे  फायबर समृद्ध धान्य आहे.

नाचणीची इडली

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मागील लेखामध्ये आपण वाचलेच असेल दिवाळीच्या खाण्यामुळे आणि काहींच्या लॉकडाऊन मुळे वजन वाढले आहे ते आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आज मी काही पौष्टिक पदार्थ आणि त्याचा हेल्थ बेनेफिट काय आहे ते सांगणार आहे. त्यासाठी नाचणी हा सर्वात मोठा घटक आहे.

नाचणीमध्ये ट्रिप्टोफेन नावाचे अमिनो ऍसिड आहे. जे भूक कमी करण्यास मदत करते आणि वजन नियंत्रणात येण्यासाठीही  मदत करते. नाचणी हे  फायबर समृद्ध धान्य आहे.

 आज पाहूया आपण नाचणीची इन्स्टंट इडली 

साहित्य : 
१ कप नाचणीचे पीठ 
१ कप बारीक रवा 
अर्धा कप उडीद डाळ 
१ कप आंबट दही 
अर्धा चमचा इनो 
चवीनुसार मीठ 

कृती :
- अर्धा कप उडीद डाळ गरम पाण्यात अर्धा तास भिजवावी. 
- बारीक रवा अर्धा तास बेताच्या पाण्यात भिजवावा.  
- उडीद डाळ बारीक वाटावी. डाळ हलकी वाटण्यासाठी ती थांबून थांबून मिक्सर मधून काढावी. 
- बारीक रवा मिक्सरमध्ये वाटावा. वाटताना त्यात नाचणीचे पीठ घालावं. 
एका बाउल मध्ये उडदाची पेस्ट, रवा, नाचणी एकत्र एकजीव करावे. त्यात वाटीभर -आंबट दही आणि अंदाजे मीठ घालून पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. . 
- यामध्ये अर्धा चमचा इनो घालून मिश्रण एकजीव करून इडली साच्याला तेल / तूप लावून केलेलं मिश्रण त्यामध्ये अंदाजाने घालावे आणि लावलेल्या इडली पात्रात साधारण १५ / २० मिनिटे इडल्या वाफवून घ्याव्यात. 
- या इडल्यांचा गरम गरम असतानाच चटणी बरोबर किंवा सांबर बरोबर आस्वाद घ्यावा. 

टीप :  याचा पिठामध्ये थोडे पाणी टाकून मिश्रण थोडे पातळ केल्यास  नाचणीचे चविष्ठ डोसे तयार होतात.
(Edited by Sharayu kakade)

loading image