esakal | Immunity Booster Food: चांगल्या प्रतिकारशक्तीसाठी 'या' फळांचे सेवन फायदेशीर
sakal

बोलून बातमी शोधा

fruits

Immunity Booster Food: चांगल्या प्रतिकारशक्तीसाठी 'या' फळांचे सेवन फायदेशीर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देशात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. प्रतिदिन सध्या देशात ३ लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहे. पहिल्या लाटेत देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर कमी होता पण या दुसऱ्या लाटेत मृत्यूदर आणि पॉझिटिव्हीटी रेटही वाढला आहे. अशात घरी राहण्यासाठी प्रशासनाकडून सूचना दिल्या जात आहेत. घरी असताना योग्य आहार घेतल्यास त्याचा फायदा प्रतिकारशक्ती वाढवण्यास होऊ शकतो. त्यामूळे सध्या कोणत्या पदार्थांचा किंवा फळांचा आहारात समावेश केला पाहिजे ते जाणून घेऊया.

1. संत्री-

संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस आणि कोलीन सारखे पौष्टिक घटक आढळतात. उन्हाळ्यात शरीराला आवश्यक पाण्याचे पोषण मिळाले पाहिजे, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते. याशिवाय संत्राचे सेवन केल्याने सूर्य किरणांपासून होणा-या आजारांपासून बचाव होतो.

2. आंबा-

उन्हाळा सुरू होताच आंब्याचा हंगाम सुरू होतो. आंब्यात भरपूर व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, लोह, तांबे, पोटॅशियम आढळतात. ज्याचा उपयोग वाढत्या प्रतिकारशक्तीसह इतर अनेक आजारांपासून संरक्षण करण्यास होतो.

3. द्राक्षे-

द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी तसेच पोटॅशियम आणि कॅल्शियम द्राक्षांमध्ये मुबलक आढळते. याव्यतिरिक्त, त्यात फ्लॅव्होनॉइड्स नावाचा एक शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट घटक आहे, जो शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानलो जातो.

4. लिंबू-

लिंबूमध्ये थायमिन, नियासिन, राइबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी -6, व्हिटॅमिन ई आणि फोलेट यासह जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. जी तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते आणि बर्‍याच संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण देते.

loading image