फक्त १० मिनिटात बनवा पोह्याचे अप्पे | instant poha appe recipe | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 instant poha appe recipe

फक्त १० मिनिटात बनवा पोह्याचे अप्पे

खवय्यांना नेहमीच काही ना काही तर वेगळ खाण्याची इच्छा होत असते. सकाळी उठल्यानंतर काहीतरी मस्त नाश्ता असावा असं प्रत्येकाला वाटत असतं. इडली, डोसा, सांभार याव्यतिरिक्त अनेक साऊथ इंडियन पदार्थां नेहमी आपण आस्वाद घेत असतो. पण इडली किंवा डोसा बनवायचा म्हणजे पीठ दळा, आंबवा अशी तयारी आधीच करावी लागते. पण तुम्ही कधी पोह्याचे अप्पच ट्राय केलेत का? तर पोह्यांपासून अगदी कमीत कमी वेळात अप्पे बनवण्याची रेसेपी घ्या जाणून...(instant poha appe recipe)

हेही वाचा: Shravan Somvar 2022: उपवासाच्या दिवशी बनवा साबुदाणा डोसा

अप्पे हा क्लासिक दक्षिण भारतीय पदार्थ आहे. अनेकदा साईट डिश म्हणून खाल्ले जाते. अप्पे आंबवलेले तांदूळ आणि किसलेले खोबरे यांच्यापासून बनवले जाते, परंतु ही रेसिपी आंबवण्याच्या प्रक्रियेशिवाय वेगळी आहे.

साहित्य

पोहे

रवा

दही

मीठ आणि पाणी

हेही वाचा: Kitchen Tips: अन्न शिजवलेल्या भांड्यात का जेऊ नये, जाणून घ्या त्या मागची कारणे...

कृती

पोहे, रवा, दही, मीठ आणि पाणी घालून एकजीव करा. ते नीट मिसळा आणि थोडा वेळ तसेच ठेवा. त्यानंतर ते मिश्रण बारिक करुन घ्या. त्याची पेस्ट बनवा. मीठ आणि आवश्यक असल्यास अधिक पाणी घाला. तवा गरम करून पीठ घाला, मंद आचेवर शिजू द्या. तुम्हाला अप्पम फ्लिप करण्याची गरज नाही. अप्पमवरील हवेचे बुडबुडे एकसारखे शिजले की अप्पम तयार होईल.

Web Title: Instant Poha Appe Recipe

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top