

jaunpur famous atom bomb sweet
esakal
उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील सुजानगंज बाजारपेठेतील 'ॲटम बॉम्ब' ही मिठाई आपल्या हटके नावामुळे आणि अप्रतिम चवीमुळे राज्यभर प्रसिद्ध झाली आहे. दिसायला मोठ्या रसगुल्ल्यासारखी असली तरी तिची चव आणि बनवण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. या मिठाईची लोकप्रियता इतकी आहे की, दररोज सुमारे ३५० ते ४०० किलो मिठाईची विक्री होते.