
How to make wheat kheer for Hanuman Jayanti: दरवर्षी चैत्र महिन्यातील पौर्णिमेला हनुमान जयंती मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरी केली जाते. हनुमानाचे भक्त हा सणाची आतुरतेने वाट पाहतात. यंदा १२ एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जात आहे. धार्मिक मान्यतेनुसार या पवित्र दिवशी, आई अंजनी आणि वानर राजा केसरी यांच्या पोटी शूर बजरंगबलीचा जन्म झाला. म्हणून, हा दिवस हनुमानजींची जयंती म्हणून मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
तसेच भगवान हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी मनोभावे पूजा करून नैवेद्य अर्पण करावे. तुम्ही यंदा हनुमान जयंतीनिमित्त गव्हाची खीर तयार करू शकता. गव्हाची खीर बनवणे सोपे असून चवदार देखील आहे. गव्हाची खीर बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे हे जाणून घेऊया.