ग्लॅम-फूड : ‘पालेभाज्या अगदी उत्तम’ | Food | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्लॅम-फूड : ‘पालेभाज्या अगदी उत्तम’
ग्लॅम-फूड : ‘पालेभाज्या अगदी उत्तम’

ग्लॅम-फूड : ‘पालेभाज्या अगदी उत्तम’

- काजल आगरवाल

काजल तंदुरुस्त राहण्याच्या बाबतीत अतिशय शिस्तप्रिय आहे. ती स्वतःच्या; तसेच कुटुंबाच्या शारीरिक स्वास्थाबद्दल नेहमीच सजग असते. काजल दररोज ताज्या फळांचे रस, नारळाचे पाणी; तसेच खूप पाणी पिण्यावर भर देते. ती जेवणात हंगामी पालेभाज्या आवर्जून खाते. तिच्या दैनंदिन आहारातही गाजर, सफरचंद, काकडी, चेरी टोमॅटोपासून अ‍ॅव्होकॅडोपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश असतो. हिरव्या भाज्या खाल्ल्याने तिला भूक लागणे व थकवा असे जाणवत नाही. दही आणि पनीरदेखील तिला नियमित खाणे आवडते!

‘केळीची भाकरी’ आणि डालगोना कॉफी हे तिचे आवडते आहेत. काजलचा सुदृढ आणि स्वस्थ राहण्यासाठी नेहमी निरोगी पदार्थांकडे कल असतो. हैदराबादी बिर्याणी तिचा सर्वांत आवडता मेनू आहे. काजलला स्वयंपाक करायलाही खूप आवडते आणि ती विविध पदार्थ स्वादिष्ट बनवते, असे तिचे म्हणणे आहे. तिने मध्ये इन्स्टाग्रामवर निरोगी पद्धतीने अ, क जीवनसत्त्वे असणारा ‘पालक उत्तपम’ कसा असावा हे शेअर केले होते. त्याच्यासोबतच नारळ, पुदिना आणि कोथिंबीर चटणी त्या उत्तपमची चव वाढवते, असे तिने म्हटले होते.

तिची आवडती डिश म्हणजे कोको, नट मिल्क, नट बटर, ताज्या बेरी, बिया आणि कोको निब्सने भरलेला मोठ्ठासा वाडगा. तिने त्या डिशचा फोटो इन्स्टाग्रामवरदेखील शेअर केला आहे. आइस्क्रीममध्ये मिंट चॉकलेट चिप तिचा विशेष आवडता फ्लेवर आहे. निंबू पाणी आणि अर्ल ग्रे टी हे तिचे आवडते पेय आहे. तिला जेवणामध्ये थाई, जपानी, व्हिएतनामी आणि सर्व आशियाई पाककृती आवडतात. काही दिवसांपूर्वी तिने तमिळनाडूतील एका मेसमध्ये मस्त जेवणाचा आस्वाद घेतानाचा फोटो इन्स्टावर शेअर केला आहे. पोल्लाचीमध्ये ही शांती मेस तिच्या आवडत्या रेस्टॉरंटपैकी एक आहे. ती नऊ वर्षांची असल्यापासून तेथील जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी जाते.

लॉकडाउन असताना काजल कुटुंबासोबत शुद्ध आंध्र पद्धतीचे जेवण स्वतः बनवत होती. आंध्र पद्धतीचे जेवण काजलला खूप आवडते. त्यामध्ये तिने पहिल्यांदा बेंडकाया पुलुसु, सोरकाई पचडी आणि पेसरत्तू हे बनवले होते व त्याचा आस्वाद कुटुंबासोबत घेत होती. तिने गाजर केक आणि डार्क चॉकलेट आणि पीनट बटर क्विनोआ ब्राउनीजसारखे पदार्थही केले होते. ज्या चाहत्यांना ते बेक करायचे आहेत, त्यांच्यासाठी तिने रेसिपीदेखील शेअर केल्या होत्या.

loading image
go to top