esakal | Kaju Pista Recipe : असा बनवा घरच्या घरी काजू, पिस्ता रोल
sakal

बोलून बातमी शोधा

Kaju Pista

Kaju Pista Recipe :असा बनवा घरच्या घरी काजू, पिस्ता रोल

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

बाप्पाचे आगमन जसे जवळ येईल तसे तयारीला अधिक जोर येतो. मग घरची सजावट असो की, नैवैद्याची तयारी. यात मिठाईची रेलचेल ही सुरु होतेच. त्यातच या दिवसात काजू, पिस्ता, बदाम याची जणू मुक्त उधळणच. गणेशोत्सवात विशेषता अश्या मिठाईना खुप पसंती असते. आपण खुप वेगवेगळ्या पध्दतीने ही रेसपी बनवू शकतो.

काजू, पिस्ता, बदामचा वापर करुन अगदी सोप्या पध्दतीने रोल ही बनवता येतात. हे रोल ड्राय फ्रूट्सने भरलेले असतात. भरपूर ऊर्जा देण्याबरोबरच ते चवदार देखील असतात. काजू पिस्तापासून तयार केलेली मिठाई बाजारात सहज उपलब्ध आहे. पण या दिवसात अनेक लोक बाजारात बनवलेली मिठाई टाळत आहेत. आज तुम्हाला काजू आणि पिस्ता रोल रेसिपी कशी बनवायची ते सांगणार आहोत. ज्याचा वापर डिनर पार्टीमध्ये देखील केला जाऊ शकतो.

काजू आणि पिस्ता रोल चे साहित्य

काजू - 750 ग्रॅम

पिस्ता - 300 ग्रॅम

साखर चौकोनी तुकडे - 800 ग्रॅम

वेलची पावडर - 5 ग्रॅम

चांदीची पाने (सजवण्यासाठी)

काजू आणि पिस्ता रोल कसा बनवायचा

काजू आणि पिस्ता रोल बनवण्यासाठी आधी काजू भिजवा. नंतर पिस्ताची साल काढून घ्या. आता हे दोन्ही वेगवेगळे बारीक करून त्यांची पेस्ट बनवा. नंतर काजूमध्ये साखर ६५०आणि पिस्ताच्या मिश्रणात 150 ग्रॅम साखर घाला. आता दोन्ही मिश्रण वेगळे शिजवा. दोन्ही मिश्रणातून साखर विरघळल्यावर त्यात वेलची पूड घाला.आता ते पॅनमधून बाहेर काढा. आता काजू आणि पिस्ता रोल करा आणि ते एका शीटसारखे तयार करा. दोन्ही पाने एकमेंकावर ठेवून मधून रोल करा. आता ते चांदीच्या पानांनी सजवा आणि सर्व्ह करा.

loading image
go to top