घरीच बनवा मसालेदार काकोरी कबाब ; जाणून घ्या रेसिपी

घरीच बनवा मसालेदार काकोरी कबाब ; जाणून घ्या रेसिपी
घरीच बनवा मसालेदार काकोरी कबाब ; जाणून घ्या रेसिपीGoogle

काकोरी कबाब हि एक अशी डिश आहे. जी सर्वाना आवडतेच. यात पॅन फ्राईड, डिप फ्राईड खूप टेस्टी लागते. शिवाय जर याच्यावर मसाला टाकला तर अजून चांगली टेस्ट लागते. मसाल्याचा बॅलेन्स आणि टेक्स्चर जर योग्य असेल तर खाण्याची टेस्ट आणखीनच वाढते. हा काकोरी कबाब तुम्ही घरीच बनवू शकता. कशी बनवायची रेसीपी जाणून घेऊया.

हि डिश लखनऊच्या काकोरी जिल्ह्यातील स्थानिक स्वामी नवाब सैयद मोहम्मद हैदर काज़मी यांनी ब्रिटिश काळात एका पार्टीसाठी तयार केली होती. नवाबने पाहुण्यांना हि डिश खायला बोलवले होते. यावेळी एका ब्रिटीश अधिकार्‍याने या डिश बाबत अश्लील टिप्पणी केली. यावर संतापलेल्या नवाबाने खानसाला कबाबचे टेंटर बनवण्याचा आदेश दिला. या घटनेपासून काकोरी कबाब प्रसिध्द झाले.

काकोरी कबाब रेसिपी

सुरवातीला खेमा तयार केलेले मटण मसाल्यात मिक्स करा. चार तासासाठी मॅरीनेट करा. नंतर जाडसर वाटण सारखे बारीक करून घ्या. हे मिश्रण चांगले मळून घ्या आणि त्यात भाजलेले हरभरे आणि अंडी घाला. यानंतर एक तास रेफ्रिजरेट करा. सर्व्ह करण्यापूर्वी सुमारे 25 मिनिटे मटणाला कट करताना चार भागात आकार देऊन कट करा. आता कबाबला ड्रिप ट्रेवर किंवा प्रीहेटेड ओव्हनमध्ये ग्रिलवर ठेवा. पंधरा ते वीस मिनिटे चांगले सोनेरी रंग येऊ पर्यत तयार होवू द्या. नंतर ब्रशने तूप लावून घ्या. यानंतर परत दोन मिनिटे परत शिजवून घ्या. याला चाट मसाला आणि लिंबूने गार्निश करा. पालक चटणी सोबत खाऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com