esakal | माझी पाककृती : मिश्र डाळींचे धिरडे
sakal

बोलून बातमी शोधा

Daliche Dhirade

माझी पाककृती : मिश्र डाळींचे धिरडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- कल्पना तिडके, नाशिक

मिश्र डाळींचे धिरडे हे नाश्त्यामध्ये खाण्यासाठी, अतिशय पौष्टिक आणि लवकर तयार होणारा चविष्ट पदार्थ होय. प्रथिनांनी युक्त अशा या डाळींचा हा पदार्थ केवळ रुचकरच नव्हे तर समग्र आरोग्यदायी असा आहे. यासाठी वापरण्यात येणारा धने-जिरे, आले-लसूण पचनासाठी मदत करतात.

साहित्य :

४ चमचे तांदूळ, २ चमचे मूग डाळ, २ चमचे मसूर डाळ, २ चमचे उडीद डाळ, २ चमचे चणा डाळ, २ चमचे चवळी, २ हिरव्या मिरच्या, आलं-लसूण पेस्ट, हळद, जिरे, हिंग, ओवा, धने-जिरे पूड, चवीनुसार मीठ, तेल.

कृती :

सर्वप्रथम वरील सर्व धान्य ४ ते ५ तास भिजत घालावे. त्यानंतर, त्याचे मिक्सरमध्ये बारीक वाटण तयार करावे.

त्यात हिरवी मिरची, आलं लसणाची भरड टाकावी. चिमूटभर ओवा हळद, जिरे, हिंग, धने-जिरे पूड चवीनुसार मीठ एकत्र करावे. थोडे पाणी घालून सरबरीत वाटण करावे.

गरम तव्यावर थोडेसे तेल टाकून पळीने धिरडे पसरवावे, चांगले सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यावे.

या मिश्र डाळीच्या धिरड्याचा सॉस, लोणचे, चटणी, लोणी अथवा दही यांसोबत आस्वाद घेऊ शकतो.

हे पौष्टिक धिरडे खूप चविष्टही लागते.

loading image
go to top