घरी फ्रीज नाही, अन्न खराब होतंय? 'या' बेस्ट टिप्स जरुर वापरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Milk

घरी फ्रीज नाही, अन्न खराब होतंय? 'या' बेस्ट टिप्स जरुर वापरा

सातारा : थंडीच्या दिवसात कमी. मात्र, उन्हाळ्याच्या दिवसात फ्रिज हा प्रत्येक घराचा एक महत्त्वाचा भाग बनतो. कोणतेही अन्न काही दिवस सहजपणे फ्रीजमध्ये ठेवले जाते, परंतु काहीवेळा विद्युत अडचणीमुळे किंवा फ्रिज खराब झाल्यामुळे रेफ्रिजरेटर काम करणे थांबवतो. अशा परिस्थितीत फ्रिजशिवाय काही तासांत अन्न खराब होऊ लागते. कधी-कधी या पदार्थांमध्ये बॅक्टेरिया देखील वाढतात.

काही कारणास्तव फ्रीज खराब असल्यास किंवा फ्रीज नसल्यास बर्‍याच लोकांना अन्न आणि पेय सुरक्षित ठेवणे अवघड होते. आपल्या बाबतीतही असेच काही घडल्यास घाबरून जाण्याची गरज नाही. काही उपायांच्या मदतीने आपण सहजपणे अन्नपदार्थ सुरक्षित ठेवू शकता आणि ते देखील नैसर्गिक मार्गाने. चला तर मग या उपायांबद्दल जाणून घेऊया.

व्यायामापुर्वी या पाच गाेष्टी टाळा; अन्यथा तुमचा हाेईल ताेटा

असे ठेवा लोणी, जॅम सुरक्षित

बाजारातून खरेदी केलेले किंवा घरी बनविलेले बटर आणि जॅम फ्रीजमध्ये न ठेवल्यास फार लवकर खराब होतात. अशा परिस्थितीत जर फ्रीज खराब असेल तर त्यांना सुरक्षित ठेवणे आणखीन अवघड होते. पण, आता तसे होणार नाही. आपण त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी थंड पाण्याचा वापर करू शकता. त्यासाठी तुम्ही पात्रात पाणी घ्या. आता त्यात लोणी आणि जामची बाटली घाला. त्यानंतर हे बरेच दिवस खराब होण्यापासून वाचेल.

उन्हाळ्यात अंडी खराब होतात?

उन्हाळ्याच्या हंगामातही अंडी खूप लवकर खराब होतात. विशेषतः उकडलेली अंडी एक ते दोन तासांनंतर खराब होऊ लागतात. ही अंडी आपण सुरक्षित ठेवण्यासाठी पाण्यात बुडवून देखील ठेऊ शकता. आपल्याकडे फ्रिज नसल्यास घरातील कोणत्याही थंड ठिकाणी ती ठेवू शकता.

दह्यासाठी ह्या क्लुप्त्या वापरा

इतर पदार्थांच्या तुलनेत दही खूप लवकर खराब होते. एक ते दोन दिवसानंतर त्यात बॅक्टेरियाही वाढतात. अशा परिस्थितीत आपण दही सुरक्षित ठेवण्यासाठी दोन युक्त्या वापरू शकता. प्रथम आपण ते थंड पाण्यात ठेवू शकता. दुसरे म्हणजे, आपण मध वापरुन दही कोरडे ठेवू शकता. यासाठी तुम्ही दह्यामध्ये एक ते दोन चमचे मध घालून चांगले मिसळा. यामुळे दही खराब होणार नाही.

बदाम मर्यादित प्रमाणात खा; जाणून घ्या ताेटे

चिकन आणि मासे

बर्‍याचदा असे घडते, की घरात चिकन आणि मासे आणली जातात. मात्र, त्या दिवशी न करता आपण दुसऱ्या दिवशी ते शिजवतो. अशा परिस्थितीत, आपण ते अन्न खराब होऊ नये यासाठी मीठ आणि हळदीचा वापरू करु शकता. होय, यासाठी आपण चिकन आणि माशांमध्ये मीठ आणि हळद घाला व चांगले मिसळून एका थंड जागी ठेवा. असे केल्याने ते खराब होणार नाही.

आता दूध होणार नाही खराब

दह्याबरोबरच दूधही पटकन खराब होते. आपण ते फ्रिजशिवाय दोन मार्गांनी देखील संचयित करू शकता. यासाठी आपण प्रथम ते उकळत किंवा कच्चे दूध थंड पाण्यात साठवून ठेवू शकता. यातही तुम्ही दह्यासारखी एक ते दोन चमचे मध घालून खराब होण्यापासून वाचवू शकता. या टिप्सच्या मदतीने आपण काही दिवस सहजपणे आपले खाद्य पदार्थ सुरक्षित ठेवू शकता.

Web Title: Keep Eggs And Milk Safe Without

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :MilkEggs
go to top