esakal | Food : खजूर केक
sakal

बोलून बातमी शोधा

Food : खजूर केक

Food : खजूर केक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

साहित्य : खजूर- दीड किलो, ऑलिव्ह ऑइल -१०० मिली, दूध - २५० मिली, घवाचे पीठ - २. ५० किलो, अमुल बटर - ५० ग्रॅम, काजु - १० -१५ नग, बदाम- ८-१० नग, डेअरी मिल्क चॉकलेट १ नग

कृती : खजूर ४ ते ५ तास कोमट पाण्यात भिजवून ठेवावे. खजूर मऊ झाले की मिक्‍सरमध्ये फिरवून घेणे. एका भांड्यामध्ये खजुराची पेस्ट घेऊन ऑलिव्ह ऑईल किंवा तूप (४-५ चमचा) आणि त्यावर गव्हाचे पीठ चाळून घेणे. हे मिक्‍स करून घ्यावे. तसं दूध घालून केकला लागेल असे स्वरूपाचे पीठ तयार करणे. त्यामध्ये अर्धा चमचा खायचा सोडा आणि एक चमचा बेकिंग पावडर घालून मिक्‍स करणे. त्यानंतर चॉकलेट, काजू, बदाम बनवलेल्या पीठामध्ये मिक्‍स करावे. केकचं भांडं घेऊन बटर लावून घेणे आणि नंतर सगळ मिश्रण त्यामध्ये घालून ठेवणे. मोठे जर्मनचे पातिले घेऊन मीठ थोडं गरम करून घेणे. केकचे भांडे पातिल्यामध्ये अडणीवर ठेवून ४५ मिनिटे मीडियम गॅसवर ठेवावे. अशाप्रकारे उत्तम असा खजूर केक तयार होईल.

loading image
go to top