esakal | चिकनच्या 'या' खास रेसिपी नक्की ट्राय करा
sakal

बोलून बातमी शोधा

चिकनच्या 'या' खास रेसिपी नक्की ट्राय करा

चिकनच्या 'या' खास रेसिपी नक्की ट्राय करा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोल्हापूर : नॉनव्हेज हे आपल्या भारतीय खाण्यामध्ये सर्वात जास्त पसंदीत आणि लोकप्रिय आहे. यासाठी लोक सर्वात जास्त पसंती देतात. (chicken dish recipe tips) काहीजण नॉनव्हेज साठी अक्षरश: वेडे असतात. यांना फुडी असंही म्हणतात. यामध्ये अनेक प्रकारच्या व्हरायटी आहेत. जसं की चिकन, मटन, फिश यांना लोक आपल्या याचा आस्वाद घेत असतात. (chicken tips) चिकनपासून अनेक पदार्थ आपण बनवू शकतो. जसे की चिकन करी, बटर चिकन, कढाई चिकन, चिकन टिक्का, चिकन मसाला, चिकन कोरमा, चिकन ग्रेवी बनवू शकतो. (homemade chicken tips) आपल्या कोणत्याही पार्टीमध्ये चिकनचा समावेश असतो. तुम्हाला नॉनव्हेज खाणं पसंत असेल आणि तेही वेगवेगळ्या डिशमध्ये तर तुम्ही घरीच हे पदार्थ बनवू शकता. (best 2 recipe for chicken) यासंबधित काही रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे वेळही वाचतो आणि जास्त मेहनतही करावी लागत नाही.

बटर चिकन

तुम्ही घरीच चिकन बनवणार असाल, किंवा घरी एखादी पार्टी अथवा डिनर असेल तर बटर चिकन हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. ही एक नॉर्थ इंडियन डिश आहे. तुम्ही घरी असलेले चिकन शिजवून, त्यात टोमॅटो प्यरी आणि क्रीमसोबत घालून परफेक्ट बटर चिकन बनवू शकता.

बनवण्याची पद्धत

बटर चिकनची ग्रेवी बनवण्यासाठी एका पॅनमध्ये लोणी घाला आणि ते गरम करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो प्युरी घालून ते फ्राय करून घ्या. या मिश्रणात जिरे, थोडीशी साखर, लाल मिरची पावडर ,मीठ घाला आणि यानंतर शिजवलेले चिकन या मिश्रणात घाला. लोणीसोबत क्रीम, हिरवी मिरची, मेथीचे पाणे घालून पाच मिनिटांसाठी परतवून घ्या. हे मिश्रण शिजण्यासाठी ठेवा. तुमची बटरचिकन तयार आहे.

लिंबू आणि हिरवी मिरची चिकन

जर तुम्हाला काही चटपटीत, झणझणीत खाण्याची चव असेल तर तुम्ही लिंबू किंवा हिरवी मिरची पासून बनवलेलं चिकन ट्राय करु शकता. हे तुम्ही घरीच सोप्या पद्धतीने बनवू शकता आणि तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यामध्ये ग्रेवीही तयार करू शकता. तुम्ही चपाती किंवा राईस दोन्हीसोबत हा पदार्थ खाऊ शकता.

हेही वाचा: Photo Story: निसर्गाच्या कुशीत वसलेले कासवांचे गाव ' वेळास '

बनवण्याची पद्धत

सुरुवातीला चिकन स्वच्छ धुऊन घ्या. त्यानंतर एक चमचा लिंबूचा रस, काळी मिरची पावडर, आले-लसूण पेस्ट घालुन ते मुरवून घ्या. यानंतर चिकन बनवण्यासाठी एका पॅनमध्ये लोणी घालून ते गरम करून घ्या. त्यामध्ये टोमॅटो प्युरी घालून फ्राय करून घ्या. यानंतर जिरे, थोडीशी साखर, लाल मिरची पावडर, टाका. यानंतर हे मिश्रण पाच मिनिटांसाठी परतवून घ्या आणि त्यानंतर ते शिजू द्या. तुमची डीश तयार आहे.