esakal | पावसाळ्यात गुजराती स्टाईल कच्छी दाबेली बनवा घरच्या घरी
sakal

बोलून बातमी शोधा

पावसाळ्यात गुजराती स्टाईल कच्छी दाबेली बनवा घरच्या घरी

कच्छी दाबेली ही पश्चिम भारतातील एक लोकप्रिय डिश आहे

पावसाळ्यात गुजराती स्टाईल कच्छी दाबेली बनवा घरच्या घरी

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

कच्छी दाबेली ही पश्चिम भारतातील एक लोकप्रिय डिश आहे आणि त्याची उत्पत्ती गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात झाली आहे. पावसाळ्यात गरमागरम पकोडे, वडापाव, कच्छी दाबेली खाण्याची इच्छा होते. त्यातील कच्छी दाबेली खायला खूप चविष्ट लागते. त्याची चव आंबट आणि गोड. त्यात मसाले भरलेले असल्यामुळे त्याला दाबेली असे म्हणतात. ही गुजरातची एक डिश आहे. चला तर मग जाणून घेऊया दाबेली बनवण्याची सोपी रेसिपी.

हेही वाचा: घरी बनवा हाॅटेलसारखं पनीर बटर मसाला, रेसिपी घ्या जाणून

साहित्य:

-पाव 8

-लोणी 6 टिस्पून

-डाळिंब 3 टिस्पून

-लवंगा 1

-जिरे पूड १ टीस्पून

-उकडलेले बटाटे 2

-पाणी 1 चमचे

- मीठ चवीनुसार

- कोथिंबीर

-शेंगदाणे 1/4 कप

- कांदे 2

- चिंचेची चटणी

- धणे पावडर 1 टीस्पून

- लाल मिरच्या 2

-दालचिनी 1/2

- चिमूटभर हिंग

-हिरवी चटणी

-जिरे पूड 1 टीस्पून

हेही वाचा: कुरकरीत बटाटा भजे बनवा घरी, 'ही' आहे रेसिपी

दाबेली कशी करावी

स्टेप 1- दाबेली मसाला

कढईत लवंग, दालचिनी, कोथिंबीर आणि लाल मिरच्या मध्यम आचेवर भाजून घ्या. नंतर ते थंड करून मिक्सरमध्ये बारीक करा.

स्टेप 2- बटाटा मसाला तयार करा

स्टफिंग करण्यासाठी, दुसर्‍या पॅनमध्ये तेल गरम करा. आता त्यात जिरे घालून त्यांना तडतडू द्या आणि मिश्रणात हिंग, ग्राउंड मसाला, मॅश बटाटे, पाणी आणि मीठ घाला आणि चांगले मिसळा. सगळे मिश्रण पावामध्ये भरून घ्या. त्यानंतर एका तव्यावर पावामध्ये भरलेले स्टफिंग दोन्ही बाजूने भाजून घ्या. दाबेली तयार झाल्यावर त्याच्यावर शेव लावा. अशाप्रकारे चटपटी गुजराती स्टाईल कच्छी दाबेली तयार झाली.

loading image