घरीच बनवा हाॅटेलसारखा 'लच्छा पराठा'; 'या' टिप्स करा फाॅलो

Lachha Paratha
Lachha ParathaGoogle

थंडीच्या दिवसात सकाळी सकाळी गरम-गरम फेमस पंजाबी लच्छा पराठा आणि सोबत चहा असेल तर...तोंडाला पाणी सुटले ना. गव्हाचे पीठ आणि तूप यापासून तयार झालेला हा भारतीय लच्छा पराठा (Lachha Paratha) खूप छान दिसतोच, शिवाय खायलाही खूप टेस्टी असतो. खरंतर हा पराठा हाॅटेलसारखा घरी बनवण तसं खूप कठीण आहे. मात्र थोडीशी मेहनत घेतली तर घरीच खूप छान पराठा तयार होईल. यासाठी काही छोट्या टिप्स देणारा आहोत त्या तुम्ही फॉलो करा.

या टिप्स करा फाॅलो

  • पीठ मळत असताना कडक मळू नका थोडे मऊ मळा.

  • पीठ मळत असताना त्यामध्ये तेल गरम करून घाला.

  • पराठा तळत असताना मंद गॅसवर तळू नका.

  • पीठ मळून झाल्यानंतर फ्रिजमध्ये अर्धा तास ठेवा.

  • पराठा लाटून झाल्यानंतर त्यावर कोरडे पीठ भूरभूरा आणि तूप लावा.

  • पराठा बनवत असताना त्याचा स्वाद चांगला येण्यासाठी कसुरी मेथी, ओवा, पुदिना, किचन किंग मसाला टाका.

Lachha Paratha
हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी बनवा पौष्टिक सुप ; जाणून घ्या रेसीपी

कृती :

पंजाबी लच्छा पराठा बनवण्यासाठी गव्हाचे पीठ, मीठ, थोडी साखर, बेकिंग पावडर मिक्स करून दुधाचा हात लावून किंवा पाणी घेऊन मळून घ्या. याला अर्धा तास फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्या. त्यानंतर पराठा लाटत असताना त्यावर गव्हाचे पीठ भुरभुरून घ्या. आणि वरती तूप लावा. जितकी पातळ पोळी लाटता येईल तेवढी लाटून घ्या. आता त्याचा रोल बनवून कट करून परत लाटा. मळलेले पीठ शक्य तितके ताणून घ्या आणि स्विस रोल सारखे रोल करायला सुरुवात करा. हलक्या हाताने दाबून गोळा बनवून पराटा लाटून घ्या.गॅसवर तवा ठेवून पराठा सोनेरी रंग येईपर्यत भाजून घ्या. झाला पराठा तयार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com