Diwali Festival 2021 : घरीच करा टेस्टी लसूण शेव

Diwali Festival 2021 : घरीच करा टेस्टी लसूण शेव

दिवाळीत काही पदार्थ विकत आणले जातात. शेव हा पदार्थ त्यापैकी एक. मात्र शेव घरीही करता येऊ शकते. त्यात लसूण घालून केल्यास अधिक चविष्ट लागते.

साहित्य- साहित्य, तीन वाट्या डाळीचे पीठ,दीड वाटी मैदा, दोन वाट्या उकडलेल्या बटाट्याचा लगदा, १२-१३ लसूण पाकळ्या, मूठभर कोथिंबीर, सहा-सात हिरव्या मिरच्या, दोन ते अडीच चमचे मीठ, हळद चमचाभर, तळण्यासाठी तेल.

कृती - मैदा व डाळीचे पीठ एकत्र चाळून त्याची सैलसर पुरचुंडी करून प्रेशर कुकरमध्ये चाळणीवर ठेवून दोन शिट्ट्या करून घ्या. मिरची, कोथिंबीर, लसूण, मीठ एकत्र वाटा. त्याच भांड्यात (मिक्सरच्या) वाफवलेले पीठ पहिल्या स्पीड वर चालू बंद करत सारखे करा. नंतर सर्व साहित्य एकत्र करून घट्ट भिजवा मध्यम आचेवर सोनेरी रंगावर शेव तळा.

(संदर्भ: पुस्तक- दिवाळी फराळ, सकाळ प्रकाशन, लेखिका-जयश्री कुबेर)

Diwali Festival 2021 : घरीच करा टेस्टी लसूण शेव
Diwali Festival 2021 : खमंग कोथिंबीर चिवडा, वाचा रेसिपी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com