घरच्या घरी बनवा लज्जतदार रेसिपी

trending-food
trending-food

लॉकडाउन सुरू होऊन महिना पूर्ण होत आहे. बरेच रेस्टॉरंट्स, आउटलेट्स आणि बेकरी सावधगिरी म्हणून बंद झालेले आहेत. इतके दिवस बाहेरचे काहीच खाणे मिळत नसल्याने सगळेच लॉकडाउनच्या पहिल्याच आठवड्यात अस्वस्थ झालेले जाणवले. वेगवेगळे पदार्थ खायची इच्छा इतकी तीव्र आहे की, बरेच जण सूत्रे आपल्या हातात घेऊन सामान्यतः बाहेरच मिळणारे पदार्थ घरीच बनवत आहेत.

सोशल मीडियामुळे हा ट्रेंड झपाट्याने वाढला. जवळपास रोजच फॅमिली व्हॉट्सॲप ग्रुप्सवर स्वयंपाकात केलेले नवनवीन प्रयोगांचे फोटो पडतच असतात. त्यात भर म्हणजे इंस्टाग्राम आणि फेसबुक. तोंडाला पाणी सुटेल असे पदार्थांचे फोटो बघून प्रत्येकालाच आपणही प्रयोग केले पाहिजेत, असे वाटते. प्रत्येकातील ‘शेफ’ आता जागा झाला आहे. हातात असलेला वेळ, असंख्य यूट्यूब व्हिडिओज आणि ‘पुणे इट आऊट्स’सारख्या ग्रुप्सवर रेसिपी बघून सगळेच वेगवेगळे पाककृती ट्राय करत आहेत. 

आपणही घरातच बनवायचे ट्रेंडी पदार्थ पाहुयात... 

ब्रेड आणि लादीपाव : ब्रेड दुकानात आणि डिलिव्हरीमध्ये मिळत असला, तरी अनेकजण घरी बनवण्याचा उपक्रम करताना दिसत आहेत. यामध्ये यीस्ट घालून करतात तो व्हाईट ब्रेड, ब्राउन ब्रेड असो किंवा ब्रेड विदाउट यीस्ट, मल्टिग्रेन ब्रेड, सरडोह ब्रेड असे अनेक आणि नावीन्यपूर्ण ब्रेडचे प्रकार घरी बनवत आहेत. होम मेड लादीपाव सोशल मीडियावर हिट झाला आहे. आपण वडापाव, पावभाजी, मिसळपाव, कच्छी दाबेली खाताच आलोय. अनेक वेळा हे पदार्थ घरीही बनवले जातात, पण पाव विकतचाच असतो. या काळात अनेक जण चक्क लादीपावही घरी बनवत आहेत. याच्या अनेक रेसिपीज इंटरनेटवर, खासकरून अनेक फेसबुक ग्रुप्सवर फ्लोट होताना दिसत आहेत. 

पाणीपुरी आणि चाट : पाणीपुरी आणि एसपीडीपी सगळ्यांचाच आवडीची. भेळ, पाणीपुरीची दुकान बंद असताना आणि बाजारात पुऱ्यांची कमतरता असतानाही अस्सल चाट फॅन्स पाणीपुरी किंवा एसपीडीपी खायची म्हणून चक्क पुऱ्या घरी बनवत आहेत. आणि आश्चर्यकारकरीत्या त्या छान फुगतही आहेत! 

मोमोज : अलीकडच्या काळात पुण्यातील तरुणांमध्ये मोमोजची लोकप्रियता अधिकच वाढलीये. अनेक प्रकारचे मोमोज सर्व्ह करणारी शेकडो दुकाफ आणि गाड्यांवर कायम गर्दी असते. साहजिकच सगळे मोमोजना मिस करतायत आणि म्हणूनच आता अनेक जण घरीच मोमोजचा बेत करत आहेत. व्हिडिओज बघून आणि रेसिपी शेअर करून स्टीम्ड आणि फ्राईड मोमोज, त्यांचे वेगवेगळे सारण आणि आवरण बनवणे ट्राय करत आहेत. या सगळ्यांचे फोटो सोशल मीडियावर बघायला मिळत आहेत. 

जिलेबी - जिलेबी आपण सणासुदीला आणि लग्नसमारंभांना खातोच. घरी अगदी क्वचितच बनवतो. ती जवळच्या हलवायाकडून आणली जाते. लॉकडाऊनच्या काळात बरेच जण जिलेबी घरी बनवायला शिकल्याचा दिसून येत आहे. इतकी वर्षे बाहेरून आणतोय, पण करायला अतिशय सोपा पदार्थ आहे, हे आता लक्षात येतेय. 

केक्स - बेकिंग तशी वेळखाऊ गोष्ट आहे. सध्या वेळेचा प्रॉब्लेम नसल्यामुळे सर्वांचे बेकिंग जोरात सुरू आहे. ओव्हनमध्ये किंवा कुकर, कढईमध्ये प्रत्येकजण केक बनवत आहे. मग त्यात रवा केक असो किंवा चीजकेक, काहीच सोडले नाहीये. सोशल मीडियावर सध्या एकदम लोकप्रिय आहेत ते म्हणजे ३ इन्ग्रेडिएंट केक आणि एका मिनिटात बनणारे मग केक्स. बनाना ब्रेड हा केक सध्या चर्चेत आहे. अनेक सेलिब्रिटीजही हा केक बनवताना दिसतायेत. यू-ट्यूब वर अनेक रेसिपी उपलब्ध असल्यामुळे जितका करू तितके कमी वाटते. केकसोबत अनेक फ्लेवरचे कूकीज देखील बनवत आहेत. 

पास्ता : पॅकेट आणून पास्ता करणे कॉमन आहे. सध्या अनेकजण पास्ताचे किचकट प्रकार म्हणजेच रॅविओली पास्ता आणि ग्नयोकी पास्ता देखील घरी ट्राय करत आहेत. 

पिझ्झा : हा आपण घरी बेस आणून अनेकवेळा केला आहे, पण आता बेस मिळतोय कुठे? साहजिकच उत्साही कलाकार अगदी मैदा असो किंवा होल व्हाइट किंवा मल्टी ग्रेन, पिझ्झा सध्या अगदी स्क्रॅचपासून जिद्दीने बनवत आहेत. ओव्हन नसल्यास तवा, तव्याऐवजी कढईचा वापर करून तो बनवलाच जातोय... 
बाकी मग बटर गार्लिक नान असो किंवा घरच्या घरी पनीर बनवून त्याचे वेगवेगळे पदार्थ अगदी जोरात सुरू आहेत. लॉकडाउनमधून अनेक जण ‘शेफ’ बनणार, हे नक्की. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com