Lucknow’s secret royal dessert- chilgoza halwa recipe
lucknow’s secret royal dessert: नवाबांचे शहर म्हणून ओळखले जाणारे लखनौ हे फक्त आपल्या लज्जतदार कबाब आणि शाही संस्कृतीसाठीच नाही, तर तिथल्या खास मिठाईसाठीही जगभरात प्रसिद्ध आहे. ती महागडी मिठाई म्हणजे 'चिलगोजा हलवा'. सामान्यतः रवा, गाजर किंवा मुगाच्या डाळीपासून बनवल्या जाणाऱ्या हलव्यांपेक्षा हा हलवा पूर्णपणे वेगळा आहे. बाजारात या हलव्याची किंमत ५,००० ते ६,००० रुपये प्रति किलो इतकी आहे.
चिलगोजा हलवा हा प्रामुख्याने पाईन नट्स (चिलगोजा), शुद्ध साजूक तूप, फुल-फॅट दूध, खवा, केशर आणि वेलची यांच्या मिश्रणातून तयार केला जातो. हा हलवा खूप मऊ, क्रीमी आणि चविष्ट असतो. पूर्वीच्या काळात हा हलवा फक्त राजघराण्यातील सण-उत्सव, भव्य विवाहसोहळे आणि शाही मेजवानीमध्येच वाढला जायचा.