माझी रेसिपी : मटार आंबोळी

खरे तर आपली खाद्यसंस्कृती खूप विस्तृत आहे. आता आंबोळीचेच उदाहरण द्यायचे झाले, तर तळकोकणात आंबोळी वेगळ्या पद्धतीने बनवली जाते, तर रायगड जिल्ह्यामध्ये वेगळ्या पद्धतीने.
Matar Amboli
Matar AmboliSakal

- मधुरा बाचल

खरे तर आपली खाद्यसंस्कृती खूप विस्तृत आहे. आता आंबोळीचेच उदाहरण द्यायचे झाले, तर तळकोकणात आंबोळी वेगळ्या पद्धतीने बनवली जाते, तर रायगड जिल्ह्यामध्ये वेगळ्या पद्धतीने. आज आपण मालवणमध्ये ज्या पद्धतीने आंबोळी बनवली जाते ती पद्धत बघणार आहोत, त्यामध्ये ताज्या मटारचा वापर करणार आहोत. दिसायला आणि चवीलाही ही आंबोळी भन्नाट लागते आणि मटारऐवजी आवडीनुसार इतर भाज्यांचादेखील वापर करू शकता.

साहित्य :

दोन कप तांदूळ, अर्धा उडदाची डाळ, एक कप तयार भात, अर्धा चमचा मेथी दाणे, मीठ, दीड कप ताजा मटार, ३-४ हिरव्या मिरच्या.

कृती :

  • डाळ आणि तांदूळ एकत्र स्वच्छ धुऊन त्यामध्ये मेथीचे दाणे आणि पाणी घालून ५ तास भिजत घालावे.

  • ५ तासांनंतर भिजलेले डाळ, तांदूळ आणि शिजलेला भात एकत्र मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. वाटण करताना कमीत कमी पाण्याचा वापर करावा. पीठ थोडेसे घट्टसर ठेवावे. पीठ झाकून कमीत कमी १२-१४ तास आंबवण्यासाठी ठेवून दयावे.

  • दुसऱ्या दिवशी पीठ आंबवून झाल्यावर त्यामध्ये मीठ घालून व्यवस्थित मिसळून घ्यावे.

  • तव्यामध्ये तेल गरम करावे त्यामध्ये मटार, हिरवी मिरची घालून ५-६ मिनिट मटार परतून घ्यावेत.

  • मिक्सरमध्ये मटार घेऊन थोडेसे पाणी घालून पेस्ट करून घ्यावी. ही तयार पेस्ट आंबवलेल्या पिठामध्ये घालून व्यवस्थित एकत्र करून घ्यावे.

  • गरम तव्यावर तेल लावून पळीभर पीठ सोडून आंबोळी झाकण ठेवून २ मिनिटे आंबोळी वाफवून घ्यावी. झाकण काढून खालील पसरवून घ्यावी. बाजूने खरपूस होईपर्यंत भाजून घ्यावी. कोणत्याही चटणी किंवा सॉसबरोबर गरमागरम सर्व्ह करावी.

  • सूचना : शिजलेल्या भाताऐवजी भिजवलेले पोहे घालू शकता. मटार शिजत आला, की त्यामध्ये पालकाची पानंही घालू शकता, म्हणजे आंबोळी आणखी पौष्टिक बनेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com