थंडीत गरमा-गरम घरीच टेस्ट करा 'चिकन थुक्पा': जाणून घ्या रेसिपी ; Chicken Thukpa Recipe | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chicken Thukpa Recipe

थंडीत गरमा-गरम घरीच टेस्ट करा 'चिकन थुक्पा' : जाणून घ्या रेसिपी

थंडीच्या दिवसात स्पेशल काहीतरी खावे असे सतत वाटंत राहते. तुम्ही जर नाॅनव्हेज खाण्याचे शौकिन असाल तर या थंडीत चिकन थुक्पा (Chicken Thukpa Recipe) ही रेसिपी बनवून खावा. ही एक पारंपारीक नुडल्स रेसीपी आहे. जी सिक्कीम आणि अरूणाचल प्रदेशात (Sikkim,Arunachal Pradesh) खूप फेमस आहे. ही रेसीपी व्हेजेटेबल आणि चिकन मिक्स करून बनवली जाते. याच चिकन शिवाय गाजर, हिरवा कांदा, लसून, सोया साॅस आणि अंडे नुडल्स घातले जाते. चला तर जाणून घेऊया चिकन थुक्पा रेसीपी..

साहित्य :

चिकन लेग पीस

गाजर

कांद्याची पात

लसून

आदरक

हिरवी मिर्ची

लिंबाचा रस

कोथंबिर

१ टी स्पून मध

१ टी स्पून सोया साॅस

२ टेबल स्पून जैतून तेल

अंडा नुडल्स

कृती :

चिकन लेग पीसला वेगळे करा. पाच ते सहा हिरव्या मिर्च्या मधून कट करा. लसून बारीक तुकडे करून घ्या. कढईत दोन चमचे तेल घाला. यात चिकन पीस घालून शालो फ्राय करून घ्या. सोनेरी रंगावर चिकण होत आले की, यात कांदा, गाजर, आदरक,लसून, कांद्याची पात आणि हिरवी मिर्ची, मीठ,कोथंबिर घाला. आता थोडे पाणी घालून मंद आचेवर शिजवून घ्या. यानंतर यात लिंबाचा रस, सोया साॅस, मध घालून मिक्स करून घ्या. यावर झाकण ठेवून परत १० मिनिटे शिजवून घ्या. गॅस बंद करून यातील चिकणचे पीस काढून घ्या. त्यात अंडा नुडल्स घालून पाच मिनिटे शिजवून घ्या. चिकणचे छोटे- छोटे तुकडे करून परत त्या रश्यात घालून दोन ते तिन मिनिटे शिजवून घ्या. कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा.

loading image
go to top