esakal | उरलेला भातापासून तयार करा जिलेबी; जाणून घ्या पद्धत
sakal

बोलून बातमी शोधा

Make jalebi from the rest of the rice Learn the method

काही लोकांना गोड खायला आवडते तर काहींना अजिबात आवडत नाही. तुम्हाल गोड आवडत असेल तर उरलेल्या भातापासून जिलेबी तयार करू शकता. होय जिलेबी. उरलेल्या भातापासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवता येतात.

उरलेला भातापासून तयार करा जिलेबी; जाणून घ्या पद्धत

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : भारतीय संस्कृतीत आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले जाते. यामुळे घरी स्वयंपाक तयार करताना एक जण जास्तीचा जेवेल इतका स्वयंपाक तयार होत असतो. मात्र, कधीकधी भात उरतो. मग प्रश्न उपस्थित होतो उरलेल्या भाताचे काय करायचे. आपण भात तर फेकत नाही. त्याला फ्राय करून किंवा पुन्हा गरम करून खात असतो. मात्र, आता अस करण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाल काहीतरी वेगळ करण्याच आज शिकवणार आहोत.

काही लोकांना गोड खायला आवडते तर काहींना अजिबात आवडत नाही. तुम्हाल गोड आवडत असेल तर उरलेल्या भातापासून जिलेबी तयार करू शकता. होय जिलेबी. उरलेल्या भातापासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवता येतात. ही रेसिपी झटपट तयार करता येईल आणि खायला चवदारही वाटेल. चला तर पाहूया कशी तयार करायची जिलेबी...

लागणारी मुख्य सामग्री

एक कप उरलेला तांदूळ, पीठ, तीन चमचे दही, अर्धा कप साखर, पाणी, अर्धा चम्मच बेकिंग पावडर, लहान खाद्य रंग व जलेबीच्या आकारासाठी पिशवी

अशी करा तयार

तुम्ही घेतलेले तांदूळ हे पूर्णपणे साफ असावे. आता त्याला बारीक करून घ्या. आता यात पाणी घालून इडलीच्या पिठासारखे करा. आता त्यात तीन चमचे दही घाला आणि मिश्रण चांगले मिसळा. त्याचबरोबर त्यात संत्रा फूड कलर घाला. तुमचे पीठ पातळ झाले असेल तर त्यात एक चम्मच पीठ टाका. जाड झाले असेल तर अर्धा चमचे दही घाला. यानंतर पीठ थोडावेळ तसच राहू द्या.

आता एका भांड्यात साखरेची चाचनी तयार करा आणि थोडावेळ थंड होऊ द्या. आता पीठ पिशवीत टाकून जिलेबीचा आकार देत गरम तेलात पीळा. यानंतर जिलेबी चाचनीत टाका आणि एक मिनिट बुडवून ठेवा. आता तुमची जिलेबी तयार झाली. साखरेची चाचनी करताना तुम्ही थोडी वेलची देखील टाकू शकता.

loading image